येवला बाजारपेठेत व्यवहार मंदावले
By Admin | Updated: August 8, 2014 01:08 IST2014-08-08T00:43:40+5:302014-08-08T01:08:07+5:30
येवला बाजारपेठेत व्यवहार मंदावले

येवला बाजारपेठेत व्यवहार मंदावले
येवला : तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या अंदरसूल परिसरात मागील काही दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतमालाच्या झालेल्या नुकसानामुळे बाजारपेठेतील व्यवहार सुस्त झाले आहे.
अंदरसूलची लोकसंख्या जास्त आहे. हॉटेल्स, हॉस्पिटल्स, किराणा शॉपी, इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने, मोटारसायकल, शोरूम, कापड दुकाने, मोबाइल दुकाने, कृषी
उत्पन्न बाजार, उपबाजार आवार, शाळा, कॉलेज, बँका, एटीएम सुविधा, अंदरसूलमध्ये आहेत. बाजारपेठ शेतकरीवर्गावर अवलंबून आहे. मागील काही दिवसांत अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती मालाचे झालेले नुकसान व उशिरा आलेल्या पावसामुळे लांबलेल्या पेरण्या यामुळे हातात राखून ठेवलेला पैसा खर्च करण्यात शेतकरी उदासीनता दाखवत आहे. परिणामी व्यापारीवर्गाला ग्राहकांची वाट पाहत दिवस घालवावा लागत आहे. नवीन पीक हातात येईपर्यंत शेतकरी हातातला पैसा राखून ठेवत आहे. अंदरसूल शिवारात परप्रांतातील मजूर शेतमजुरी करण्यासाठी येत असतांना पुरेसे काम हाती नसल्यामुळे त्यांनीदेखील परतीचा मार्ग धरला
आहे. (वार्ताहर)
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकदेखील बाजारात खरेदी करण्यासाठी उत्सुक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विविध व्यवसायांवर मंदीचे सावट आहे.