शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

यंदाच्या दिवाळीतही ‘चायना मेड’ला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:38 IST

आठवड्यावर येऊन ठेपलेल्या दिवाळीची तयारी घरोघरी जोरात सुरू असताना बाजारपेठाही वस्तू आणि माणसांनी गजबजून गेल्या आहेत. दिवाळीसाठी अगणित वस्तूंची खरेदी केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात या वस्तू आकर्षक वेष्टनात, सवलतीत दाखल झाल्या आहेत.

नाशिक : आठवड्यावर येऊन ठेपलेल्या दिवाळीची तयारी घरोघरी जोरात सुरू असताना बाजारपेठाही वस्तू आणि माणसांनी गजबजून गेल्या आहेत. दिवाळीसाठी अगणित वस्तूंची खरेदी केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात या वस्तू आकर्षक वेष्टनात, सवलतीत दाखल झाल्या आहेत.यंदाही बाजारपेठेत चिनी वस्तूंना नाकारून रोषणाईसाठी स्वदेशी वस्तूंचे वर्चस्व दिसून येत आहे. मेनरोड, पंचवटी, रविवार पेठ आदी शहरातील मुख्य बाजारपेठांसह शहरातील सर्व उपनगरांमध्ये रोषणाई साहित्याची रेलचेल दिसून येत आहे. काही वस्तूंसाठी स्वदेशी तर काही वस्तूंसाठी चिनी बनावटीच्या वस्तूंना नाशिककरांची प्रथम पसंती मिळत आहे. त्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लायटिंगच्या माळा, आकाशकंदील, पणत्यांची माळ, फटाके, हॅलोजन ट्यूब, आबालवृद्धांसाठीचे गिफ्ट आयटम्स, फळे, फटाके फोडण्याची बंदूक आदि वस्तूंचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले आहे. काही वर्षांपूर्वी कमी दर, चमकदमक असलेले आवरण, आवडीचे रंग या वैशिष्ट्यांमुळे चायना मेड वस्तू नाशिककरांना आकर्षित करण्यात यशस्वी होत होत्या. मात्र आता स्वदेशी वस्तूंकडेच नाशिककरांचा ओढा वाढला आहे. यामुळे स्थानिक कारागिरांनी मेहनतीने केलेल्या वस्तूंना न्यायही मिळत आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून स्वदेशी बनावटीच्या वस्तूंना ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. आमच्या दुकानात सध्या आकाशकंदील, लायटिंग माळा, पणत्या, हॅलोजन यात स्वदेशी बनावटीच्या प्रकारांना मागणी जास्त आहे.  - भावेंद्र जावळे, व्यावसायिकवाढती महागाई व त्या तुलनेत तुटपुंजी आर्थिक आवक बघता जो ब्रॅँड कमी दरात वस्तू देईल ती घेण्याशिवाय पर्याय नसतो. पण तरीदेखील गेल्या ३-४ वर्षांपासून स्वदेशी बनावटीच्या वस्तूच घ्याव्याशा वाटत आहे. त्यामुळे दर्जा, किंमत, वापरण्यास सुलभता हे सारे बघून गरिबातल्या गरिबालाही ती वस्तू घ्यावीशी वाटेल, असा विचार उत्पादकांनी करायला हवा. - रवींद्र काळकर, ग्राहकअसे आहेत तुलनात्मक दरवस्तूचे नाव भारतीय दर चिनी दरआकाशकंदील २५० ते १००० रु. १०० ते ४५० रु.लायटिंग माळ १३० ते ३५० रु. २० ते ३५० रु.एलइडी फोकस ५० ते ७० रु. ५० ते ६०० रु.पणत्यांची माळ —— १०० ते १२५ रु.हॅलोजन ट्यूब ९० ते ६५० रु. ८ ते ६० रु.फटाक्याची बंदूक २५ ते ५० रु. १२ ते ४० रु.

टॅग्स :DiwaliदिवाळीNashikनाशिक