येवल्यात प्रशिक्षण वर्ग उत्साहात

By Admin | Updated: October 31, 2015 22:55 IST2015-10-31T22:53:13+5:302015-10-31T22:55:16+5:30

येवल्यात प्रशिक्षण वर्ग उत्साहात

In Yavle, the training classes are excited | येवल्यात प्रशिक्षण वर्ग उत्साहात

येवल्यात प्रशिक्षण वर्ग उत्साहात


येवला : तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना पंचायत राज, कायदेविषयक ज्ञान, ग्रामपंचायतीच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य अवगत व्हावे, व खऱ्या अर्थाने पंचायतराज ची अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने येवला पंचायत समितीने आयोजित केलेला प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न झाला.
येवला पंचायत समितीत गोखले एज्युकेशन सोसायटीचे पंचायतराज प्रशिक्षण केंद्र कोसबाड हिल जि. पालघर यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत सदस्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प.स.सभापती प्रकाश वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरात पंचायत राज प्रशिक्षण केंद्र कोसबाड हिल येथील प्रा. प्रदीप चौधरी यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले. या शिबिरात ग्रामपंचायत सदस्यांना सत्तेचे विकेंद्रीकरणाचा इतिहास, ७३ वी घटना दुरु स्ती व त्यामध्ये झालेले कायदेविषयक बदल, ग्रामपंचायतीची रचना विभाजन, मासिक सभेचे महत्व, ग्रामसभेचे महत्व, महिला सभेचे महत्व, महिला सबलीकरण, व लिंगभेद संकल्पना, सरपंच व उपसरपंच व सदस्य यांच्या जबाबदार्या व कर्तव्य, करआकारणी, वसुली, स्वच्छ पाणीपुरवठा, मग्रारोहयो ची अंमलबजावणी व ग्रामपंचायती अंतर्गत पंचायत समतिी मधील व जि.प. मधील विविध विभागामार्फत राबविलेल्या जाणार्या विविध योजनेविषयी माहिती दिली. पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, स्वच्छ भारत अभियानांतर्गत, वैयिक्तक शौचालय व सार्वजनिक स्वच्छतेबाबत महत्व पटवून देण्यात आले. त्याचप्रमाणे प्रशिक्षणार्थी ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच व सदस्य यांना निर्माण होणार्या अडचणी सोडविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात करण्यात आले. यावेळी जी.प.सदस्य कृष्णराव गुंड, प्रवीण गायकवाड, सचिन कळमकर, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, ज्ञानेश्वर सपकाळे, ज्ञानेश्वर कर्हाळे उपस्थित होते.
येवला : आंतर महाविद्यालयीन नेटबॉल स्पर्धा येथील कला, वाणज्यि महाविद्यालयात संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन प्रा. डॉ. हरीश आडके यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचा संघ विजयी झाला के.टी.एच.एम. महाविद्यालयाचा संघ उपविजेता ठरला. स्पर्धेचे पंच म्हणून स्वप्नील कर्पे, रीसम परविंदर, किरण कुलकर्णी, बादल आढाव यांनी काम पाहिले. (वार्ताहर)

 

Web Title: In Yavle, the training classes are excited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.