येवल्यात कांद्याची १५ हजार क्विंटल आवक
By Admin | Updated: July 14, 2014 00:31 IST2014-07-13T22:44:36+5:302014-07-14T00:31:51+5:30
येवल्यात कांद्याची १५ हजार क्विंटल आवक

येवल्यात कांद्याची १५ हजार क्विंटल आवक
येवला : केंद्र शासनाने निर्यातमूल्य ५०० डॉलर प्रति मे टन केल्याने कांद्याचे भाव घसरले आहे. निर्यातमूल्यात वाढ झाल्याने परदेशातही कांदा मागणी सर्वसाधारण होती. याशिवाय देशातही मागणी कमी झाली आहे.
येवला मार्केट यार्डवर गेल्या सप्ताहात १४,९३२ क्विंटल काद्यांची आवक झाली. किमान बाजारभाव ६०० रुपये ते कमाल बाजारभाव २२८६ रुपये प्रतिक्विंटल होते. सरासरी १८०० रुपये प्रतिक्विंटल कांदा विकला गेला.
अंदरसूल उपबाजारात १४,५१२ क्विंटल झाली. कांद्याचे किमान ६०० रुपये कमाल २१५१ रुपये, तर सरासरी ७००रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव होते. गहू व हरभरा आवक घटली असून, बाजारभाव मात्र स्थिर असल्याचे चित्र होते, तर मकाची आवक केवळ १३ क्विंटल झाली बाजारभाव किमान १३२७ रु. कमाल १४०० रु. प्रतिक्विंटल व सरासरी १३७५ रुपये होते.