येसोजी महाराज वीर मिरवणूक

By Admin | Updated: March 28, 2017 22:05 IST2017-03-28T22:05:27+5:302017-03-28T22:05:27+5:30

घनकर गल्लीमधील मानाचा वीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येसोजी महाराज ऊर्फ दाजीबा वीराची मिरवणूक मंगळवारी (दि.२८) जल्लोषात काढण्यात आली.

Yasji Maharaj Veer procession | येसोजी महाराज वीर मिरवणूक

येसोजी महाराज वीर मिरवणूक

नाशिक : घनकर गल्लीमधील मानाचा वीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येसोजी महाराज ऊर्फ दाजीबा वीराची मिरवणूक मंगळवारी (दि.२८) जल्लोषात काढण्यात आली. पारंपरिक वाद्य वादन करत घनकर गल्लीमधील तुळजा भवानी मंदिरापासून मिरवणूकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी सुवासिनी महिलांसह पुरूष भाविकांनीही वीराचे दर्शन घेतले. मानाचा येसोजी महाराज यांचा चांदीचा मुखवटा परिधान करून वीराने नृत्य करत मिरवणूकीमध्ये सहभाग घेतला. मिरवणूकीने रामकुंड येथे वीराने पोहचून गोदापात्रात पाय धुवून परंपरेप्रमाणे वाजत गाजत पुन्हा घनकर लेन येथील मंदिराजवळ प्रस्थान केले.
सुमारे दीडशे वर्ष जुन्या प्राचीन परंपरेनुसार येसोजी महाराज वीराच्या मिरवणूकीमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. युवकांनी वीरासोबत नृत्य करत घनकर गल्ली, रविवार कारंजा, सराफ बाजारमार्गे रामकुंडावर पोहचून गोदापात्रात परंपरेनुसार पाय धुतले. यावर्षी मिरवणूकीत वीराच्या भुमिकेत विशाल मोरे हे होते. दरवर्षी या मानाच्या येसोजी मिरवणूक धुलीवंदनाला निघते. मात्र मोरे कुटुंबियांमध्ये मुलाचा जन्म झाल्याने वीराची मिरवणूक गुढी पाडव्याला काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मोरे कुटुंबियामधील सदस्यांनी सांगितले. मिरवणूकीत संभाजी मोरे, केशव मोरे, दिलीप मोरे, बापू मोरे, माधव मोरे, शरद मोरे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Yasji Maharaj Veer procession