यशोकीर्ती पुरस्कार वितरीत
By Admin | Updated: March 25, 2016 23:43 IST2016-03-25T23:12:00+5:302016-03-25T23:43:26+5:30
यशोकीर्ती पुरस्कार वितरीत

यशोकीर्ती पुरस्कार वितरीत
सातपूर : कॉम्प्युटर सोसायटी आॅफ इंडियाचा ५०वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयटी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. आरती दीक्षित यांना यशोकीर्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अभियंता शाखेच्या कार्यालयात आयोजित सीएसआयच्या वर्धापनदिन कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून नासकॉमचे प्रमुख प्रसाद देवरे, ऋषभ इन्स्ट्रुमेंटचे अध्यक्ष नरेंद्र गोलिया उपस्थित होते. दरवर्षी संगणक व आयटी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तंत्रज्ञास कै. सौ. शेवंताबाई शिरोडे स्मृती यशोकीर्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. शशांक तोडवाड आणि ऋषिकेश वाकडकर यांना तसेच शैक्षणिक स्तरावर प्रावीण्य मिळविणाऱ्या गायत्री सोनवणेसह अकरा विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे संस्थेच्या माजी अध्यक्षाचा सत्कार करण्यात आला.
स्वागत प्राचार्य प्रशांत पाटील यांनी केले. वार्षिक आढावा सचिव संदीप कारखानीस यांनी सादर केला. वर्धापनदिनाची माहिती डॉ. शिरीष साने यांनी दिली. यावेळी विवेक गोगटे, शंकर पाटील, रवि पाटील, व्ही. डी. मोरे, सुशील सोनवणे, किशोर व्यास, चंद्रशेखर डहाळे, मिलिंद रकिबे, गिरीश पगार, अविनाश शिरोडे, मनोज झाडे, मंगेश पिसोळकर, दिवाकर यावलकर, प्रीती भामरे आदिंसह संस्थेचे सभासद, महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. आभार संदीप कारखानीस यांनी मानले. (वार्ताहर)