बारावी पेपर तपासणीस असहकार आंदोलन
By Admin | Updated: February 27, 2017 01:06 IST2017-02-27T01:06:38+5:302017-02-27T01:06:57+5:30
कनाशी : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांवर येत्या तीन मार्चपर्यंत अंमलबजावणी न झाल्यास बारावी बोर्डाच्या पेपर तपासणीस असहकार आंदोलन करण्यात येईल.

बारावी पेपर तपासणीस असहकार आंदोलन
कनाशी : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या दीर्घकाळ प्रलंबित व आश्वासित मान्य मागण्यांवर येत्या तीन मार्चपर्यंत अंमलबजावणी न झाल्यास नाईलाजाने दि. ३ मार्च २०१७ पासून बारावी बोर्डाच्या पेपर तपासणीस असहकार आंदोलन करण्यात येईल. यानुसार दररोज एकाच उत्तरपत्रिकेचे परीक्षण व नियमन करण्यात येईल, अशी माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष प्रा. संजय शिंदे व सचिव प्रा. अनिल महाजन यांनी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत दिली आहे.
शिक्षणमंत्र्यांनी वेळोवेळी आश्वासने देऊनही मागण्यांची अंमलबजावणी होत नाही म्हणून संघटनेने दि. २९ नोव्हेंबर, २२ डिसेंबर २०१६ ला आझाद मैदानावर इशारा आंदोलने केली. दि. १२ जानेवारी १७ ला जेलभरो आंदोलन केले. मंत्र्यांनी १५ दिवसांत अंमलबजावणीचे आश्वासन दिले परंतु तेही हवेतच विरले. अधिकारी शिक्षणमंत्र्यांचे ऐकत नसल्यास अशा अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. शिक्षकांवरील अन्याय त्वरित दूर करावा अन्यथा आंदोलन करावे लागत असल्याचे प्रा शिंदे यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)