शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बारावी परीक्षा ; नाशिक विभागातील जळगावात सर्वाधिक कॉपी प्रकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 13:55 IST

बारावीची  परीक्षा सुरू होऊन तीन दिवस उलटले असून या पहिल्या तीन दिवांसामध्येच नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. जळगावमध्ये बारावीच्या पहिल्या पेपरपासूनच सर्वाधिक कॉपी प्रकरणे समोर आली असून त्यानंत सलग दोन दिवस जळगावचे नाव कॉपी प्रकरणांमुळे चर्चेत राहिले आहे.शिक्षण विभागाचे कॉपीमुक्त परीक्षा राबविण्यासाठी अभियान सुरू असून त्यासाठी  विभागस्तराव २८ भरारी पथके कार्यरत असताना जळगावमध्ये तीन दिवसात तब्बल ३१ कॉपी प्रकरणे समोर आल्याने सद्या नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था चर्चेचा विषय बनली आहे.

ठळक मुद्देबारावी परीक्षेत आतापर्यंत जळगावात सर्वाधिक कॉपी प्रकरणेनाशिक, नंदुरबार निरंक ; धुळ्यात चार, जळगावात 31 कॉपी प्रकरणे

नाशिक : बारावीची  परीक्षा सुरू होऊन तीन दिवस उलटले असून या पहिल्या तीन दिवांसामध्येच नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. जळगावमध्ये बारावीच्या पहिल्या पेपरपासूनच सर्वाधिक कॉपी प्रकरणे समोर आली असून त्यानंत सलग दोन दिवस जळगावचे नाव कॉपी प्रकरणांमुळे चर्चेत राहिले आहे.शिक्षण विभागाचे कॉपीमुक्त परीक्षा राबविण्यासाठी अभियान सुरू असून त्यासाठी  विभागस्तराव २८ भरारी पथके कार्यरत असताना जळगावमध्ये तीन दिवसात तब्बल ३१ कॉपी प्रकरणे समोर आल्याने सद्या नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था चर्चेचा विषय बनली आहे.बाराीवीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून पहिल्या दिवशी इंग्रजीच्या पेपरला १८ कॉपी बहाद्दरांवर कारवाई झाली होती. यात जळगावच्या सर्वाधिक १४ जणांचा समावेश होता. तर धुळ््यातून चार विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले होते. तर दुसºया दिवशी दुसऱ्या दिवशी हिंदीच्या पेपरला पकडलेले सर्वच्या सर्व पाच कॉपीबहाद्दर जळगावचेच होते. त्यानंतर शनिवारी (दि.१३) झालेल्या मातृभाषेच्या पेपरलाही जळगावमध्येच सर्वाधिक कॉपी १२ प्रकरणे समोर आल्याने आतापार्यंत झालेल्या तीन विषयाच्या पेपरमध्ये एकूण २५ कॉपी प्रकरणांपैकी जळगावमधील सर्वाधिक ३१ प्रकरणांचा समोर असून धुळयातील चार प्रकरणांचा समावेश आहे.विशेष म्हणजे नाशिक व नंदुरबार जिल्ह्यात पहिल्या दिवसापासून एकही कॉपी प्रकरण समोर आलेले नाही. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांची कॉपी मूक्त परीक्षेकडे यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे यातून दिसते. 

कॉपी रोखण्याचे आव्हानमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेस गुरुवारी (दि.२१) इंग्रजी विषयाच्या पेपरने प्रारंभ झाला. विभागातील ६७ हजार ३५८ विद्यार्र्थ्यांनी हा पेपर दिला. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.२२) विभागातील ३६ हजार ६१४ विद्यार्थ्यांनी सकाळ सत्रात हिंदी, तर दुपार सत्रात ७४८ विद्यार्थ्यांनी पर्शियन भाषेचा  पेपर दिला.परीक्षेच्या तीसºया दिवशी शनिवारी (दि.२३) सकाळच्या सत्रात एकूण १ लाख २३ हजार ७८ विद्यार्थ्यांनी मराठीचा तर दुपार सत्रात विभागातील ७ हजार ५०५ विद्यार्थी उर्दु भाषेचा पेपर दिला. परीक्षेच्या पहिल्या तीन दिवसातच जळगामध्ये एकूण ३१ कॉपीप्रकरणे समोर आली आहे. त्यामुळे विभागीय शिक्षण मंडळापुढे जळगावमधील गैरप्रकारांवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, सोमवारी (दि.२५) भौतिकशास्त्र, चिटणीसांची कार्यपद्धती व राज्यशास्त्र विषयांचे पेपर होणार आहेत. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकexamपरीक्षाStudentविद्यार्थीJalgaonजळगावDhuleधुळे