शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
2
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
3
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
4
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
6
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
7
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
8
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
9
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
10
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
11
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
12
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
13
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
14
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
15
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
16
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
17
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
18
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
19
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
20
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
Daily Top 2Weekly Top 5

जनस्थान नगरी का अधर्म अति जाहला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 01:09 IST

आटपाट नगर होते, जनस्थान त्याचे नाव.  कर्तव्य प्रतिपालक,  शिस्तशूर तुकोजीराजेंकडे  अलीकडेच त्याची मनसबदारी आलेली. राजे तसे कडव्या शिस्तीचे.  यापूर्वी ठिकठिकाणच्या गडांवर त्यांनी  चांगलीच शिस्त लावलेली.  पण, शिस्त का कुणाला आवडते?  शिवाय जनस्थानी आल्या आल्याराजेंनी सारा (कर) वसुलीही  सक्त केलीय.  आजपर्यंत मूठभर देणाऱ्यांचा  कोपरापासून अख्खा हातच कलम करण्याचे  फर्मानच काढले आहे ...

आटपाट नगर होते, जनस्थान त्याचे नाव.  कर्तव्य प्रतिपालक,  शिस्तशूर तुकोजीराजेंकडे  अलीकडेच त्याची मनसबदारी आलेली. राजे तसे कडव्या शिस्तीचे.  यापूर्वी ठिकठिकाणच्या गडांवर त्यांनी  चांगलीच शिस्त लावलेली.  पण, शिस्त का कुणाला आवडते?  शिवाय जनस्थानी आल्या आल्याराजेंनी सारा (कर) वसुलीही  सक्त केलीय.  आजपर्यंत मूठभर देणाऱ्यांचा  कोपरापासून अख्खा हातच कलम करण्याचे  फर्मानच काढले आहे त्यांनी.ना दरबारींना कसली मुभा,  ना प्रजेला कसली सवलत...कोल्हेकुई वाढली आहे ती त्यामुळेच.  प्रजा म्हणे रस्त्यावर उतरलीय. गांधींच्या टोपीला  कुण्या राळेगणच्या अण्णांनी ‘अच्छे दिन’ आणल्याने त्या टोप्या घालून व  हाती टाळ-चिपळ्या घेत  तुकोबारायांचा जप करीत  रयतेने नामसंकीर्तनही केले  दोन दिवसांपूर्वी गडाच्या द्वारी.  पण तुकोजीराजे ठाम. ....संत तुकोबारायांनीच सांगून ठेवल्याप्रमाणे  नाठाळांच्या माथी काठी हाणायाची तर  या राजेंचे अवतारकार्य येथे जाहले.  त्यामुळे रयतेच्या कीर्तनाचीव टाळ-मृदंगाच्या गजराची  त्यांना कसली आली चिंता?  ते तर मुंबई दरबारी  महाराजांकडे हजेरीस जाऊन आलेले.  त्यांच्या रजेचा खलिताही मंजूर झालेला.  तशी दवंडीही नगरात पिटली गेलेली.  पण, नाठाळांच्या चर्चांमधील  हवा काढून घेण्यासाठी  रजेचा खलिता गोदावरीत भिरकावूनतुकोजीराजे रयतेच्या सेवेत दाखल झाले.  पूर्वीचे राजे-महाराजे रात्री वेश बदलून  रयतेची ख्याली-खुशाली जाणून घ्यायला  प्रधानजींसमवेत गडाखाली फेरफटका मारत. तुकोजीराजेंनीही तसेच करायचे ठरवले.***दात घासून, शुचिर्भूत होण्याची संधी न देताच अख्ख्या प्रधानमंडळाला सोबत घेऊन  ते भल्या पहाटे नगरच्या टॅÑकवर पोहोचले.  प्रजेलाही कोण आनंद झाला  तो काय वर्णावा!  भल्याभल्यांना दर्शन न देणारे व दिले तरी  दरबारात हजेरी घेणारे राजे  आज चालत प्रजेच्या द्वारी आले...  अहाहाऽऽऽ... काय भाग्य प्रजेचे!***पूर्वीच्या काळी अशा भेटीसाठी  गडावरील दरबानांना  राजमुद्रा द्याव्या लागत म्हणे.  पण दिल्लीच्या तख्तावरील  शहेनशहांनी रोख मुद्राबंदी केल्याने  मुद्रेचा विषय संपला आता.  त्यामुळे चिठोरी ‘टोकन’ घेऊन जनता  राजेंच्या दर्शनाला आसुसलेली.  बसायला जागाच नाही म्हणण्यापेक्षा  राजेंच्या समोर बसायची  कुणाची काय बिशाद? त्यामुळे  काही ताटकळलेले, काही थबकलेले...  इतक्यात गलका झाला,  राजे आलेऽ, राजे आलेऽऽ  ट्रॅकवरील हिरवळीनेही त्यांना  मानाचा मुजरा करीत  आपल्या माना तुकविल्या..***अशीच मान तुकवत एक प्रधान  पटांगणाच्या तख्तावर आला तर  राजे संतापले. कडेलोट केल्याच्या स्वरूपात  त्यास खाली उतरविले.  बरे तरी हत्ती नव्हता सोबत  अन्यथा त्याच्या पायदळी दिले असते.  राजाच्या तख्तावर पाऊल ठेवायची  या सामान्य मुलाजिमची इतकी हिंमत?***इतक्यात धीटपणे एक बालिका पुढे आली.  थेट तख्तावरच चढली.  जणू तिचे येणे ठरलेले असावे.  ‘यदा यदा हि धर्मस्य, ग्लानिर्भवति भारत.... सम्भवामि युगे युगे !’ म्हणाली.  टाळ्यांचा गजर जाहला... राजेही भारावले, काय हे रयतेचे प्रेम.  बालिकेला म्हणाले,  ‘बेटा, काय याचा अर्थ?’ती म्हणाली, ‘जेव्हा जेव्हा धरतीवर  अधर्म वाढतो तेव्हा धर्मरक्षणार्थ  श्रीकृष्ण अवतार घेतो...’  व्वाऽ, पुन्हा टाळ्या...  उपस्थितानाही जाणीव झाली,जनस्थानातील अधर्माच्या नायनाटासाठीच तर, तुकोजीराजेंना येथे धाडले गेलेले. काय मग त्यापुढे बोलावे पामराने?  आणि बोललेले ऐकतील ते राजे कसले?*** प्रजाजनास प्रश्न पडले भरपूर  पण काही केल्या ते सोडवेना.  ज्या अधर्माच्या नाशासाठी राजे आले  तो अधर्म नेमका केला कुणी?  किल्लेदार, बिल्लेदार, भालदार, चोपदार  उरलेसुरले प्रजाजनही  सारेच जर असतील अधर्मी  तर मुंबई मुक्कामी असलेल्या  धर्मपरायण, कमलपुष्पांकित,  दत्तकविधानवीर महाराजांनी तरी  आजवर का खपवून घेतले हे सारे? त्यांच्यामुळेच ज्यांना गडाच्या  चाव्या मिळाल्या आहेत  ते किल्लेदारही मग का झाले फितूरमहाराजांनी पाठविलेल्या राजेंशी?***प्रश्नाचे उत्तर सोपे नसावेच.  तसे ते असते तर  महाराजांनीच नाही का केले असते  काही खुलासे किमान किल्लेदारांकडे.  रयतेला रस्त्यावर उतरतराजेंना राजधर्म सांगण्याची वेळ आली  ती त्यामुळेच.(कल्पनेतील हा प्रसंग व यातील व्यक्तिरेखावास्तविकतेत कुणाशी साधर्म्य साधत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.)

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका