गोंधळी समाजाबाबत चुकीचा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:12 IST2017-10-24T23:22:40+5:302017-10-25T00:12:58+5:30
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या ४९ क्रमांकाच्या अहवालानुसार मागविण्यात आलेल्या हरकती व सूचना सादर करण्याच्या सोबतच गोंधळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून गोंधळी समाजाने अहवालावरील सूचना व हरकतींसोबतच समाजाच्या विविध मागण्याही प्रशासनासमोर मांडल्या असून, शासनाने गोंधळी समाजाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याची मागणी केली आहे.

गोंधळी समाजाबाबत चुकीचा अहवाल
नाशिक : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या ४९ क्रमांकाच्या अहवालानुसार मागविण्यात आलेल्या हरकती व सूचना सादर करण्याच्या सोबतच गोंधळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून गोंधळी समाजाने अहवालावरील सूचना व हरकतींसोबतच समाजाच्या विविध मागण्याही प्रशासनासमोर मांडल्या असून, शासनाने गोंधळी समाजाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याची मागणी केली आहे. गोंधळी समाजाने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून मागासवर्ग आयोगाचे गोंधळी जमातीबाबतचे मत पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप केला असून, आयोगाने गोंधळी जमातीचा पूर्ण अभ्यास केला नसल्याची हरकतही नोंदवली आहे. आयोगाच्या ४९ क्रमांकाच्या अहवालानुसार निर्णय झाल्यास गोंधळी जमातीतील वासुदेव, जोशी, डबरी, भराडी, नंदीवाले, चित्रकथी, यांच्यासोबतच्या संबंधावर विपरित परिणाम होईल. तसेच गोंधळी समाज भूमिहीन भिक्षुक जमात असून, कलावंत जमात नाही. त्याचप्रमाणे गोंधळी पुरोहितही नसून राज्यभरात कोणत्याही मंदिरात गोंधळी पुरोहित नसल्याचा दावाही नाशिक जिल्हा रेणुका गोंधळी समाज संस्थेतर्फे करण्यात आला असून, यांसह समाजाच्या विविध मागण्यांसाठी संस्थेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. यावेळी रेणुका गोंधळी समाज संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांसह गोंधळी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.