जादा दराने गहु बियाणे प्रकरणी लेखी तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 09:10 PM2020-12-01T21:10:22+5:302020-12-02T00:00:36+5:30

सायखेडा : चालू वर्षात कोरोना महामारीने जगाला हैराण करून सोडलेले असतांना शेतीसह इतर छोट्या मोठ्या उद्योगांना यागोष्टीचा मोठा फाटका बसून सर्व घटकांचा आर्थिक कणा मोडलेला असतानाच अशातच मागील काळात कांद्याच्या बियाण्यांची कृत्रिम टंचाई त्यात आता अजित १०२ गव्हाच्या बियाणासाठी शेतकऱ्यांना प्रिंट भावापेक्षा जास्त पैसे मोजून बियाणे खरेदी करावे लागत असल्याने दिवसाढवळ्या शेतकऱ्यांची सरेआम लूट केली जात असल्याने निफाड तालुक्यातील पिंपळस येथील शेतकरी दर्शन केंगे यांनी या प्रकाराला वाचा फोडून निफाड तालुका कृषी अधिकारी बी जी पाटील यांना लेखी निवेदन दिले,

Written complaint in case of excessive rate of wheat seeds | जादा दराने गहु बियाणे प्रकरणी लेखी तक्रार

तालुका कृषी अधिकारी बी. जी. पाटील यांना निवेदन देतांना शेतकरी दर्शन केंगे.

Next
ठळक मुद्दे सायखेडा : शेतकऱ्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर

सायखेडा : चालू वर्षात कोरोना महामारीने जगाला हैराण करून सोडलेले असतांना शेतीसह इतर छोट्या मोठ्या उद्योगांना यागोष्टीचा मोठा फाटका बसून सर्व घटकांचा आर्थिक कणा मोडलेला असतानाच अशातच मागील काळात कांद्याच्या बियाण्यांची कृत्रिम टंचाई त्यात आता अजित १०२ गव्हाच्या बियाणासाठी शेतकऱ्यांना प्रिंट भावापेक्षा जास्त पैसे मोजून बियाणे खरेदी करावे लागत असल्याने दिवसाढवळ्या शेतकऱ्यांची सरेआम लूट केली जात असल्याने निफाड तालुक्यातील पिंपळस येथील शेतकरी दर्शन केंगे यांनी या प्रकाराला वाचा फोडून निफाड तालुका कृषी अधिकारी बी जी पाटील यांना लेखी निवेदन दिले,

यावेळी दिलेल्या निवेदनात सदर बियाणांची कृत्रिम टंचाई व अतिरिक्त भाववाढ ही थांबवावी तसेच प्रशासनाचे व शासनाचे धोरण यांचेवर कृषी विभागाचा खते व बियाण्यांच्या वितरणावर वचक नसल्याकारणाने व शासकीय प्रशासकीयांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याने शेतकरी वर्गाची पिळवणूक होत आहे,तरी प्रशासनाने बारकाईने लक्ष देऊन शेतकरी वर्गाची पिळवणूक त्वरित थांबवावी व यापुढे असे घडल्यास होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात शेतकरी दर्शन केंगे यांनी म्हटले आहे

प्रशासनाने याबाबीची त्वरित दखल घेऊन या सर्व गोष्टींवर यापुढे नियमित देखरेख करणे गरजेचे असून मी शेतकरी या नात्याने शेतकऱ्यांना न्याय मिळावा या भावनेने पुढे आलो आहे,
- दर्शन केंगे, शेतकरी, पिंपळस, ता. निफाड.

बियाणे कायदा १९६६ नुसार संबंधित दुकानदाराला कायदेशीर नोटीस देण्यात आली असून तीन दिवसांत त्यांनी खुलासा सादर न केल्यास त्यानंतर परवाना निलंबित करण्याची पुढील कारवाई करण्यात येईल
- बी. जी. पाटील, तालुका कृषी अधिकारी, निफाड.
 
Web Title: Written complaint in case of excessive rate of wheat seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.