शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ मल्लांनी गाजविला कुस्तीचा आखाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 17:09 IST

नामपूर :  बदलत्या जीवनशैलीत जरी कुस्ती हा खेळ मागे पडला असला तरी या गावात दरवर्षी नित्यनियमानुसार दीपावली व भवानी मातेच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल आयोजित केली जाते. जुन्या मल्लांपैकी आजही केदा लोटन मोरे, जगन्नाथ रामचंद्र काकडे, विजय राऊत यांनी गावाची शेकडो वर्षांची परंपरा कायम राखत आजही कुस्त्यांची परंपरा कायम टिकविली आहे.

ठळक मुद्देव्यायामाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मानवाचे आयुर्मान कमी झाले आहे; मात्र वयाच्या ८१ व्या वर्षीसुद्धा कुस्त्या खेळून समाजासमोर कुस्त्यांचे महत्त्व दाखवून दिल्यामुळे बिजोरसे गावातील कुस्त्यांच्या दंगलीबाबत तालुक्यात सर्वत्र चर्चा होत आहे.

नामपूर : बागलाण तालुक्यातील बिजोरसे येथे आई भवानी माता यात्रा उत्सवानिमित्त गावातील चौकात कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. बागलाण तालुक्यातील बिजोरसे गाव पूर्वीपासून कुस्त्यांच्या तालमीत प्रसिद्ध गाव आहे. रोख स्वरूपात उत्तम कुस्तीपटूंना बक्षिसे दिली जातात. यंदाच्या कुस्ती आखाड्याचे पहिले विजेते विजय राऊत व जगन्नाथ काकडे घोषित झाले असून, केदा काकडे यांनी त्यांना एक हजार रु पयांचे रोख बक्षीस दिले आहे. आजची तरु ण पिढी व्यसनाला बळी पडत असून, हा आखाडा यशस्वी करण्यासाठी सरपंच बाळकृष्ण पवार, केदा मोरे, शशिकांत काकडे, कैलास काकडे, सुरेश काकडे, शांताराम केदारे, बंडू काकडे, शिवाजी खैरनार, नानाजी रौंदळ,अभिमन काकडे, शांताराम केदारे, बंडू काकडे, शिवाजी खैरनार, नानाजी रौंदळ, अभिमन काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. तरु णांना लाजविणाऱ्या या ज्येष्ठ कुस्तीबाबत चर्चेला सर्वत्र उधाण आले आहे.प्रतिक्रि या :सन १९४६ साली भारताला स्वातंत्र्य नव्हते. माझे वय १० वर्ष होते तेव्हापासून जिल्हाभरात आजपर्यंत सुमारे एक हजारापेक्षा जास्त वेळा कुस्त्या खेळून विजयी झालो आहे. आज माझे वय ८० पेक्षा जास्त असूनही कुस्त्या खेळण्याचा मोह आवरला जात नाही. या खेळामुळेच माझी प्रकृती ठणठणीत असून, आजच्या तरु णांनी या खेळाकडे लक्ष घातले पाहिजे.- जगन्नाथ काकडे, ज्येष्ठ पहिलवान