अपघातातील जखमी दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:58 IST2018-06-04T00:58:27+5:302018-06-04T00:58:27+5:30
नाशिक : चारचाकी कारने दुचाकीस्वार वृद्ध दाम्पत्यास दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सिडकोतील वृद्धाचा शनिवारी (दि़२) जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़ प्रकाश श्रीधर निर्मल (६७, रा़ सिडको) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे़

अपघातातील जखमी दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू
नाशिक : चारचाकी कारने दुचाकीस्वार वृद्ध दाम्पत्यास दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सिडकोतील वृद्धाचा शनिवारी (दि़२) जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़ प्रकाश श्रीधर निर्मल (६७, रा़ सिडको) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे़
मयत प्रकाश निर्मल हे पत्नी आशासोबत सिडकोहून म्हसरूळजवळील वाढणे कॉलनीत जात होते़ त्यांच्या दुचाकीस कन्सारा माता चौक, साईकृपा जवळ मारुती- ७०० कारने (एमएच ०१, एम २४५) धडक दिली़ यामध्ये डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांना प्रथम कॉलेजरोडवरील खासगी रुग्णालय तसेच त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ या ठिकाणी उपचार सुरू असताना प्रकाश निर्मल यांचा मृत्यू झाला़