शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

'खाकी'कडून शस्त्रांचे पूजन; पोलीस बॅन्डने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 2:08 PM

पाण्डेय यांनी विधिवत पूजन करत शस्त्रांचे औंक्षण केले. यावेळी उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त सिताराम गायकवाड यांनीही शस्त्रांना पुष्पांजली वाहिली. यावेळी उपिस्थत पुरोहितांनी विविध मंत्रोच्चार करत शंखध्वनी वाजविला.

ठळक मुद्देदिपक पाण्डेय यांनी केली आरतीपोलिसांची रक्षा करण्यासाठी शस्त्रे महत्त्वाची ठरतात

नाशिक : साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शस्त्रपुजनाचा मुहूर्त पोलीस आयुक्तालयाने साधला. येथील शस्त्रगारामधील शस्त्रांना झेंडूची फुले वाहून बॅण्ड पथकाच्या धूनवर पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय यांनी आरती केली. पोलीस मुख्यालयात सोमवारी (दि.२६) सकाळी विवधप्रकारच्या बंदुका, रायफल, मशिनगन आदी शस्त्रे शस्त्रागारच्या वसरीमध्ये टेबलावर मांडण्यात आले होते. यावेळी शस्त्रांभोवती झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली होती. पाण्डेय यांनी विधिवत पूजन करत शस्त्रांचे औंक्षण केले. यावेळी उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त सिताराम गायकवाड यांनीही शस्त्रांना पुष्पांजली वाहिली. यावेळी उपिस्थत पुरोहितांनी विविध मंत्रोच्चार करत शंखध्वनी वाजविला.संकटकाळात पोलिसांची रक्षा करण्यासाठी शस्त्रे महत्त्वाची ठरतात. यामुळे शस्त्रे व्यवस्थित रहावी यासाठी पारंपरिक प्रथेनुसार तीथीच्या मुहुर्तावर शस्त्रांचे पूजन करण्यात आल्याचे पाण्डेय म्हणाले.

दरम्यान, जनताभिमुख पोलीस गस्तीसाठी महासंचालक कार्यालयाकडून पोलीस आयुक्तालयाला चार नवी आकर्षक पध्दतीची गस्तीवाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यामध्ये तीन बोलेरो व एक टीयुव्ही अशा चार वाहनांचा समावेश आहे. या वाहनांचेही यावेळी पाण्डेय यांनी औंक्षण करुन श्रीफळ वाढविले. पोलीस महासंचालकांच्या पुढील आदेश प्राप्त होताच या वाहनांचे परिमंडळनिहाय वाटप करुन शहरातील रस्त्यांवर गस्तीसाठी आणले जातील असे चौगुले यांनी सांगितले.-

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयpoojaपूजा