कोटमगावी वडाच्या पाराचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:17+5:302021-06-26T04:11:17+5:30
सन २०१३ मध्ये सतीश कोटमे यांनी या महावृक्षाचे रोपण केले होते. या महावृक्षाचे संगोपन ग्रामपंचायत कर्मचारी भय्या काद्री, लखन ...

कोटमगावी वडाच्या पाराचे पूजन
सन २०१३ मध्ये सतीश कोटमे यांनी या महावृक्षाचे रोपण केले होते. या महावृक्षाचे संगोपन ग्रामपंचायत कर्मचारी भय्या काद्री, लखन वाघ व ग्रामस्थांनी केले. आपल्या पारंपरिक रुढी परंपरा जपल्या जाव्यात या दृष्टिकोनातून गावात महिलांना वटसावित्री पौर्णिमा पूजनासाठी वडाचे झाड नव्हते. त्या पार्श्वभूमीवर सदर महावृक्ष लावला गेला होता. वटसावित्री पौर्णिमेनिमित्त नव्याने बांधण्यात आलेल्या पाराचे मान्यवरांचे हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. नानासाहेब लहरे, जनार्दन कोटमे, शांताराम कोटमे, अजय मगर, जगदीश घोडेराव, भीमराज चव्हाण, अशोक लहरे, भानुदास लहरे, भाऊराव कोटमे, बापूसाहेब कोटमे, मच्छिंद्र वाघ, भाऊसाहेब धांद्रे, आप्पासाहेब कोटमे, संतोष कोटमे आदी उपस्थित होते.
फोटो- २४ कोटमगाव वड
कोटमगाव येथे वडाच्या झाडाला बांधण्यात आलेल्या पाराचे पूजनप्रसंगी ग्रामस्थ.
===Photopath===
240621\071724nsk_47_24062021_13.jpg
===Caption===
फोटो- २४ कोटमगाव वडकोटमगाव येथे वडाच्या झाडाला बांधण्यात आलेल्या पाराचे पूजनप्रसंगी ग्रामस्थ.