शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
3
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
4
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
5
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
6
Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
7
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
8
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
9
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
10
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
11
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
12
Maharashtta Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
13
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
14
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
15
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
16
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
17
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
18
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
19
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
20
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी

रयतेच्या राजास मानाचा मुजरा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 11:55 PM

क्षत्रिय कुलावतंस... राजाधिराज, श्रीमंतयोगी... छत्रपती शिवाजी महाराज की जय... अशा गगनभेदी घोषणा, ढोल-ताशांचा निनाद, आकाशात उंचावणारे भगवे ध्वज आणि अबालवृद्धांनी धरलेला ठेका अशा उत्साहात शिवजयंतीची मिरवणूक पार पडली. रात्री उशिरा मिरवणुकीची सांगता झाली.

ठळक मुद्देगगनभेदी घोषणा : शिवप्रतिमेची मिरवणूक

नाशिक : क्षत्रिय कुलावतंस... राजाधिराज, श्रीमंतयोगी... छत्रपती शिवाजी महाराज की जय... अशा गगनभेदी घोषणा, ढोल-ताशांचा निनाद, आकाशात उंचावणारे भगवे ध्वज आणि अबालवृद्धांनी धरलेला ठेका अशा उत्साहात शिवजयंतीची मिरवणूक पार पडली. रात्री उशिरा मिरवणुकीची सांगता झाली.छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेप्रमाणे येणारी जयंती शहरात विविध संस्था, संघटना, मित्रमंडळांतर्फे साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त सायंकाळी शहरातून शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी ५ वाजता शहरातील वाकडी बारव येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. प्रारंभी महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे, भाजपचे गटनेते जगदीश पाटील, सभागृह नेते सतीश सोनवणे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, माजी खासदार समीर भुजबळ, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, राष्टÑवादीचे रंजन ठाकरे, संजय खैरनार, श्रमिक सेनेचे बाळासाहेब पाटील, उदयनराजे भोसले यांच्या भगिनी मनीषाराजे भोसले-पाटील, त्यांचे सुपुत्र यशराजे पाटील, सुरगाणा संस्थानच्या सोनालीराजे पवार, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून मिरवणुकीचा शुभारंभ झाला.वाकडी बारव, दूधबाजार, गाडगे महाराज चौक, धुमाळ पॉइंटमार्गे मिरवणूक पंचवटी कारंजा येथे पोहोचली. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी विविध संस्था, संघटनांतर्फे चित्ररथांचे स्वागत करून मंडळांच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. मिरवणुकीत स्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा आदींसह मर्दाणी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. काठीच्या सहायाने तरुणाच्या हातावर, डोक्यावर ठेवलेले नारळ फोडणे अशी चित्तथरारक प्रात्यक्षिके या तरुणांनी सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.

टॅग्स :cultureसांस्कृतिकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज