मोहडीत माजी सैनिकांच्या हस्ते पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 19:30 IST2021-02-21T19:29:57+5:302021-02-21T19:30:59+5:30
जानोरी : येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे ह्यएक गाव,एक शिवजयंतीह्ण सोहळा साजरा झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करताना शिवाजी जाधव व उपस्थित माजी सैनिक.
जानोरी : येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे ह्यएक गाव,एक शिवजयंतीह्ण सोहळा साजरा झाला.
राजमाता जिजाऊ चौकात उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर आठ फूट उंचीच्या सिंहसनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माजी सैनिक सर्जेराव देशमुख, शिवाजी जाधव, चंद्रभान कळमकर, राजाराम देशमुख, शांताराम जाधव, विनायक निकम यांनी पुष्पहार अर्पण केले.
यावेळी ह्यछत्रपती शिवाजी महाराज की जय...ह्णच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. भगवे ध्वज, पताकांनी परिसर भगवामय झाला होता. दिवसभर पोवाड्यांचा निनाद सुरू होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दर्शन जाधव, सुदेश देशमुख, मनोज देशमुख, हरी तांबडे, रोहित पाटील, अभिजित देशमुख, मयूर देशमुख, सुमित देशमुख, शुभम देशमुख, रोहित जाधव, परेश जाधव, आकाश जाधव, स्वरूप जाधव, छोटू देशमुख आदी प्रयत्नशील होते.