कांद्याच्या भावाबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2016 22:42 IST2016-08-12T22:41:53+5:302016-08-12T22:42:49+5:30
कांद्याच्या भावाबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता

कांद्याच्या भावाबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता
खामखेडा : गेल्या सव्वा महिन्यापासून बंद असलेले कांदा मार्केट सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जरी आनंदाचे वातावरण असले तरी, चिंता आता काय भाव मिळतो याची आहे.
शेतकरी व व्यापाऱ्यांच्या वादात सव्वा महिने लिलाव बंद होते. कोणताही निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये सरकारबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तेव्हा दिल्ली येथे कांदा खरेदीसंदर्भात केंद्रीय परिवहन व सडक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली कृषिमंत्री राधामोहन सिंह, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान, माजी कृषिमंत्री शरद पवार, पांडुरंग फुंडकर, सदाभाऊ खोत, सुभाष भामरे, हरिश्चंद्र चव्हाण आदिंच्या उपस्थित बैठक घेऊन राज्य सरकार आणि केंद्र सरकार ५०-५० टक्के भागीदारीवर कांदा खरेदी करून कांदा खरेदी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्याचा निर्णय घेता आला. या निर्णयामुळे व्यापारीवर्गाने नमते घेऊन तातडीने बैठक घेण्यात येऊन कांदा खरेदीला प्रारंभ करण्यात आला असला तरी शेतकऱ्याला अपेक्षित भाव नसल्याने त्याच्या तोंडावर पुन्हा चिंता दिसत आहे. भावाच्या चिंतेत सध्या शेतकरी दिसत आहेत.(वार्ताहर)