ओझर : येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. यावेळी नगर परिषद येथे सर्वांनी एकत्र येत जनजागृतीच्या घोषणा देत शहरातून रॅली काढली. तसेच पथनाट्य सादर करण्यात आले.रांगोळी स्पर्धेत उपकेंद्र २ प्रथम पारितोषिक, दुसरे बक्षीस उपकेंद्र ४ ने बक्षीस घेतले. तिसरे बक्षीस दिक्षी उपकेंद्र, चौथे बक्षीस उपकेंद्र ३ ला मिळाले. पाचवे बक्षीस उपकेंद्र १ ने पटकावले. त्याआधी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली कदम यांनी क्षयरोगाविषयी माहिती दिली.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय तारगे, सदफ शेख, डॉ. जुनागडे, तालुका क्षयरोग उपचार पर्यवेक्षक राजेश वराडे, क्षयरोग टेक्निशियन दीपाली मोरे, प्रयोगशाळा अधिकारी पल्लवी कुलकर्णी, आरोग्य सहायिका भारती कदम, रवींद्र देवरे, अनिल राठी, कावेरी कदम, संगीता गाडे, माधुरी कदम, रत्ना खरे, बेबी काटे, कारले सिस्टर, कांचन धामत, रोहिणी कदम, भरती लिलके, आशा मोटमल, संगीता वाबळे, बागुल सिस्टर, पांडुरंग दळवी, विकास पिठे, अनिल रामटेके, मोतीराम थोरे, अविनाश घोडविंदे आदी सहभागी झाले होते.
ओझर आरोग्य केंद्रात जागतिक क्षयरोग दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2022 22:59 IST
ओझर : येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. यावेळी नगर परिषद येथे सर्वांनी एकत्र येत जनजागृतीच्या घोषणा देत शहरातून रॅली काढली. तसेच पथनाट्य सादर करण्यात आले.
ओझर आरोग्य केंद्रात जागतिक क्षयरोग दिन
ठळक मुद्दे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली कदम यांनी क्षयरोगाविषयी माहिती दिली.