मनपामार्फत जागतिक अंतराळ सप्ताह

By Admin | Updated: September 23, 2015 00:16 IST2015-09-23T00:15:51+5:302015-09-23T00:16:15+5:30

तारांगणमध्ये उपक्रम : विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा

World Space Week by Manappa | मनपामार्फत जागतिक अंतराळ सप्ताह

मनपामार्फत जागतिक अंतराळ सप्ताह

नाशिक : महापालिकेच्या तारांगण प्रकल्पाच्या माध्यमातून दि. ४ ते १० आॅक्टोबर या कालावधीत जागतिक अंतराळ सप्ताह साजरा केला जाणार असून त्यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा तसेच खगोलप्रेमींसाठी वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी दिली.
महापालिकेच्या धूळखात पडलेल्या ‘तारांगण’ या प्रकल्पाला संजीवनी दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी आता तारांगणच्या माध्यमातूनच दि. ४ ते १० आॅक्टोबर या कालावधीत जागतिक अंतराळ सप्ताह साजरा करण्याचे नियोजन केले आहे. विज्ञानप्रेमींच्या या कुंभमेळ्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने इयत्ता सातवी आणि त्यापुढील वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोस्टर आणि निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यासंबंधी विषय निश्चित करण्यात आले आहेत. तसेच विज्ञानविषयक प्रतिकृती तयार करण्याचीही स्पर्धा घेण्यात येणार आहे. सदर स्पर्धा खगोलप्रेमींसाठी खुली ठेवण्यात आली आहे. संबंधित शाळा व महाविद्यालयांना सहभागासंबंधी पत्र पाठविण्यात आले आहे. त्याचबरोबर तारांगण येथे दुर्बीण बनविण्याची कार्यशाळा, आकाश निरीक्षणाचा उपक्रम आणि तज्ज्ञ मान्यवरांची व्याख्यानेही आयोजित करण्यात येणार आहेत.
मुलांमध्ये अंतराळ विज्ञानाबाबत आवड निर्माण व्हावी व त्यात करिअर करता यावे, यासाठी कल्पना युथ फाउण्डेशन, इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स आणि विज्ञान प्रबोधिनी यांच्या सहकार्याने सप्ताह साजरा केला जाणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: World Space Week by Manappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.