पेठला जागतिक मृदा दिन
By Admin | Updated: December 6, 2015 22:26 IST2015-12-06T22:25:52+5:302015-12-06T22:26:34+5:30
पेठला जागतिक मृदा दिन

पेठला जागतिक मृदा दिन
पेठ : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी कार्यालय पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला़
येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि़ प़ सदस्य भास्कर गावित होते़ यावेळी पेठ तालुक्यातील बाडगी व जामले येथील शेतकऱ्यांना जमीन आरोग्यपत्रिकांचे वाटप करण्यात आले़
तालुका कृषी अधिकारी शिलानाथ पवार यांनी प्रास्ताविकात जागतिक मृदा दिनाचे महत्त्व विशद करून जमीन आरोग्यपत्रिकेचे वाचन केले़
जि़ प़ सदस्य भास्कर गावित यांनी आदिवासी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी योजनांची माहिती करून घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर करावा, असे आवाहन केले़ कृषी विभागाच्या जमीन मृदापत्रिकेतील अन्नद्रव्य घटकातील शिफारशीनुसार अभ्यास करून पिकांना खते द्यावीत, असेही त्यांनी सांगितले़
यावेळी शिक्षण समिती सदस्य भास्कर गावित, पंचायत समितीचे उपसभापती महेश टोपले, भाजपाचे तालुकाध्यक्ष रामदास भोये, तालुका कृषी अधिकारी शिलानाथ पवार, मंडल कृषी अधिकारी अशोक घरटे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी, कृषी सहायक उपस्थित होते़ कृषी पर्यवेक्षक मधुकर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. मंडल कृषी अधिकारी व्ही. बी़ पाटील यांनी आभार मानले़ (वार्ताहर)