शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक रेडक्रॉस दिन : ‘नाशिक रेडक्रॉस’ने दोन तपापासून जोपासलाय लसीकरणाचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 17:29 IST

नवजात बालक व त्यांच्या मातांना वेळोवेळी लसीकरण दिल्यास विविध आजारांपासून प्रतिबंध होऊ शकतो आणि ते सुदृढ निरामय राहू शकतात, ही बाब लक्षात घेऊन इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या नाशिक शाखेने मागील दोन तपांपासून लसीकरणाचे व्रत यशस्वीपणे स्वीकारले आहे.

ठळक मुद्दे वैद्यकीय व्यवसायाच्या स्पर्धेत रेडक्रॉसची आरोग्यसेवा सरकारी योजनांतर्गत बहुतांश आजारांना प्रतिबंध घालणारे लसीकरण मोफत

नाशिक : रोगप्रतिकारक शक्ती विकसित होईपर्यंत नवजात बालकांना विविध आजारांचा धोका असतो. त्यामुळे माता-बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. नवजात बालक व त्यांच्या मातांना वेळोवेळी लसीकरण दिल्यास विविध आजारांपासून प्रतिबंध होऊ शकतो आणि ते सुदृढ निरामय राहू शकतात, ही बाब लक्षात घेऊन इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या नाशिक शाखेने मागील दोन तपांपासून लसीकरणाचे व्रत यशस्वीपणे स्वीकारले आहे.मानवजातीची सेवा या उद्देशाने इंडियन रेडक्रॉस सोसायटीची शहरामधील शाखा कार्यरत आहे. माता, बालकांसह महिला, वृद्ध व तारुण्यात पदार्पण करणाऱ्या युवतींना आवश्यक ते सर्व लसीकरण या शाखेमार्फत पुरविले जाते. सरकारी योजनांतर्गत बहुतांश आजारांना प्रतिबंध घालणारे लसीकरण या शाखेतून मोफत उपलब्ध केले जातात. महिलांच्या आजारांशी संबंधित लसीकरणही रेडक्रॉसमधून केले जाते. शनिवार हा लसीकरणाचा दिवस रेडक्रॉसने निश्चित केला आहे. लसीकरणासाठी माता-बालक उपक्रमात डॉ. प्रतिभा औंधकर व बालरोग तज्ज्ञ डॉ. नितीन बिर्ला सेवा देत आहेत. केवळ शहरामधील नव्हे तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून माता-बालक लसीकरणासाठी दर शनिवारी रविवार कारंजा येथील रेडक्रॉसच्या दवाखान्यात हजेरी लावतात. एकूणच जिल्हाभरातील रुग्णांची सेवा रेडक्रॉसकडून केली जात आहे. केवळ लसीकरणापुरते मर्यादित न राहता इंडियन रेडक्रॉस सोसायटीने काळानुरूप वैद्यकीय सेवेच्या दिशेने पुढचे पाऊल टाकत आरोग्यसेवेचे व्रत जोपासले आहे. केवळ प्रथमोपचारापुरतेच मर्यादित न राहता नाममात्र दरात फिजिओथेरपी, दंतचिकित्सा, नेत्रचिकित्सा उपचार पद्धतीही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना त्याचा अधिक फायदा होत आहे.वैद्यकीय व्यवसायाच्या स्पर्धेत रेडक्रॉसची आरोग्यसेवास्पर्धेच्या युगात वैद्यकीय व्यवसायामध्येही तीव्र स्पर्धा वाढीस लागल्याचे चित्र आहे. यामुळे दंत व नेत्रचिकित्सा आणि उपचार पद्धतीदेखील महागली असून, सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला दंत व नेत्राच्या आजाराबाबत उपचार करून घेणे शक्य होत नाही. सदर बाब लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी रेडक्रॉसच्या नाशिक शाखेने नाममात्र दरात फिजिओथेरपी केंद्रासह दंत व नेत्रचिकित्सा केंद्रही सुरू केले आहे. दररोज सकाळी दहा ते दुपारी एक वाजेच्या दरम्यान या केंद्रांवर शेकडो गरीब रुग्ण उपचार घेताना दिसून येतात. सामाजिक बांधिलकीमधून वैद्यकीय सेवेचे व्रत स्वीकारणा-या रेडक्रॉस सोसायटीने काळानुरूप आपल्या कार्यप्रणालीमध्ये बदल करत नावीन्यपूर्ण आरोग्यसेवेचा ध्यास कायम ठेवला आहे.

टॅग्स :medicineऔषधंNashikनाशिक