विश्वविक्रमी महाआरती

By Admin | Updated: February 17, 2016 23:33 IST2016-02-17T23:29:36+5:302016-02-17T23:33:15+5:30

विश्वविक्रमी महाआरती

World Record Mahatanti | विश्वविक्रमी महाआरती

विश्वविक्रमी महाआरती

 मांगीतुंगी : येथील भगवान वृषभदेवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता बुधवारी रात्री साडेनऊ वाजता महाआरतीने करण्यात आली. णमोकार मंत्रोचाराने आणि वृषभदेवांच्या जयघोषाने पाच हजार भाविकांनी सहभागी होऊन अतिशय भक्तिमय वातावरणात महाआरती केली. या महाआरतीने परिसर भक्ती सागरात डुबून गेल्याचे सर्वांना अनुभवायला मिळाले. मूर्ती निर्माण समितीने केलेल्या दाव्यानुसार जगात सर्वाधिक उंच असलेल्या भगवान वृषभदेवांना केलेली ही महाआरतीची गोल्डन बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
सर्वतोभद्र महल जवळ गणिनीप्रमुख ज्ञानमती माताजी, चंदनामती माताजी, रवींद्रकीर्ती स्वामी, अनेकांतसागर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तीच्या पायथ्याशी या महाआरतीला सुरुवात करण्यात आली.
महाआरतीत जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, प्रशासकीय अधिकारी महेश पाटील, प्रांत संजय बागडे, डॉ.पन्नालाल पापडीवाल, संजय पापडीवाल, भूषण कासलीवाल, विजयकुमार जैन, जीवनप्रकाश जैन, पी.के.जैन यांच्यासह पाच हजार भाविक सहभाग नोंदवून या गोल्डन बुक आॅफ रेकॉर्डसचे भागीदार बनले. या महाआरती प्रसंगी भाविकांनी भगवान वृषभदेवांचा जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला होता.




काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महावितरण कंपनीने भाविकांना महाआरतीसाठी विजेरी उपलब्ध करून दिल्या होत्या .या महाआरतीच्या निरीक्षणासाठी गोल्डन बुक आॅफ रेकॉर्डस चे व्यवस्थापक रजतकुमार उपस्थित होते.

Web Title: World Record Mahatanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.