शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 01:05 IST

त्र्यंबकेश्वर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आण िमराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथील मानसशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त शनिवारी(दि.१०) मानसिक आरोग्य जपताना या विषयावर जिल्हास्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देमानसिक आरोग्य जपताना ... या विषयावर जिल्हास्तरीय वेबिनार

त्र्यंबकेश्वर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आण िमराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथील मानसशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त शनिवारी(दि.१०) मानसिक आरोग्य जपताना या विषयावर जिल्हास्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. ए. के. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या वेबिनारच्या प्रारंभी मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. एम. माळी यांचा, संयोजक डॉ. एस. एस. कांबळे यांनी यथोचित सत्कार केला. प्रा. एम. आर.थोरात यांनी वेबिनारचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी उपप्राचार्य एस. एस. देवरे, प्रा. एम. एन. खालकर, डॉ. एस. जे. निकम, डॉ. एम. डी. दुगजे, प्रा. ए. एस. खाडे, जगताप आदी उपस्थित होते.मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एस.एम. माळी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना म्हणाले की, दरवर्षी जरी जागतिक मानिसक आरोग्य दिन वेगवेगळ्या कारणांनी साजरा होत असला तरी 2020 वर्षात संपन्न होणारा हा दिवस ष्श1द्बस्र-19 या महामारीला अनुसरून खूपच महत्वाचा ठरला आहे. सर्वांसाठी मानिसक आरोग्य उत्तम खबरदारी -उत्तम आरोग्य,या थीमला अनुसरून घेतल्याने, मानसशास्त्रातील क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी या वर्षभरात अतिशय मोलाची भूमिका बजावली. सर्वांचेच मानिसक आरोग्य या कालावधीत जपणे अतिशय महत्त्वाचे ठरले आहे.यापूर्वी अठराव्या शतकात मानिसक रु ग्ण, त्यांच्या पापाची शिक्षा म्हणून आजारी होतात असा समज होता. त्यामुळे रु ग्णांना बांधून ठेवले जात होते, छळ केला जात असे. नंतरच्या कालखंडात फिलिप फिनेल या शास्त्रज्ञाने ही क्रूर पद्धत बंद केली. शरीरशास्त्राच्या अभ्यासात प्रगती झाली. जैवमनोसामाजिक कारणांमुळे विकृती निर्माण होऊ शकते, असा विचार पुढे आला.आज भारतात प्रत्येक पाच व्यक्तींच्या मागे एक मनोरु ग्ण आहे. जवळपास 26 कोटी लोक मानिसक आजाराचा सामना करतात असे सरकारी आकडेवारीनुसार दिसून येते. सिग्मंड फ्राईड यांच्या मते , मन हे हिमनगासारखे असते.मनाचा थोडासाच भाग आपल्याला माहीत असतो बाकी अबोध मनाच्या पातळीवर असतो व त्यानुसार मानिसक समस्या निर्माण होतात. इदम्, अहम आण िपराअहम यामध्ये समतोल साधता आला तरच आरोग्य सुदृढ राहते. अन्यथा इदमचे प्राबल्य वाढल्यास मानिसक संघर्ष निर्माण होतात.जीवन जगत असताना कुटुंब, नातेवाईक, मित्र,यांच्यासोबत घिनष्ठ नाते सांभाळून त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. स्वत:चा व इतरांचा आदर केला पाहिजे, त्यातून आत्मसन्मान वाढवून मानिसक आरोग्य चांगले राहते. मानिसक आजाराची लक्षणे, ढोबळमानाने अचानक रडू येणे, रिकामेपणा वाटणे, झोप न लागणे, आत्महत्येचा सतत विचार येणे, निराशावादी असणे अशी दिसतात . सुदृढ मानिसक आरोग्य प्रस्थापित करण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात. त्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे, योग्य प्रमाणात आहार व झोप घेणे, इतरांविषयी पूर्वग्रह न करणे,शारीरिक दृष्ट्या तंदुरु स्त असणे, इतरांना मदत करणे यासारखी जीवनशैली अवलंबल्यास आपल्याला स्वत:चे व इतरांचे मानिसक आरोग्य निश्चित जगता येईल असे प्रतिपादन डॉ.माळी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाभरातून जवळपास 75 प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.कार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रा मिलिंद थोरात यांनी केले तर डॉ शरद कांबळे यांनी आभारप्रदर्शन केले.

टॅग्स :onlineऑनलाइनcollegeमहाविद्यालय