दत्तनगर शाळेत जागतिक हात धुवा दिन

By Admin | Updated: August 9, 2014 00:56 IST2014-08-09T00:15:52+5:302014-08-09T00:56:35+5:30

दत्तनगर शाळेत जागतिक हात धुवा दिन

World hand wash days in Dattanagar school | दत्तनगर शाळेत जागतिक हात धुवा दिन

दत्तनगर शाळेत जागतिक हात धुवा दिन

भऊर : येथील उपआरोग्य केंद्राच्या वतीने दत्तनगर जिल्हा परिषद शाळा येथे जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना वैयक्तिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात आली.
भऊर येथील उपआरोग्य केंद्राच्या वतीने अतिसार नियंत्रण पंधरवड्यानिमित्त येथील दत्तनगर जिल्हा परिषद शाळेत जागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना आरोग्य सहायक एस. एम. केदारे, आरोग्यसेवक पी. एफ. पवार, आशा स्वयंसेवक सीमा गरु ड यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक संजीव अहेर यांनी उपक्रमात विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व, स्वच्छता कशी ठेवायची, अस्वच्छतेमुळे कोणकोणते आजार होतात हे पटवून दिले. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्याला स्वच्छता कशी गरजेची आहे हे शिक्षक शोभना मोरे यांनी तक्ते चित्र दाखवत विशद केले.
आरोग्यसेवक पी. एफ. पवार यांनी हात धुण्याच्या सहा कृती शिकवल्या. यावेळी उपसरपंच कडू पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल पवार, मुख्याध्यापक संजीव अहेर, शोभना मोरे, एस. एम. केदारे, अंगणवाडीसेविका हेमलता पाटील, सीमा निरभवणे उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: World hand wash days in Dattanagar school