जागतिक अपंग दिन
By Admin | Updated: December 4, 2015 21:54 IST2015-12-04T21:53:44+5:302015-12-04T21:54:18+5:30
जागतिक अपंग दिन

जागतिक अपंग दिन
मालेगाव : कसमादे परिसरातील विविध शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांमध्ये जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.
सिद्धेश्वर विद्यालय, भऊर
देवळा तालुक्यातील भऊर येथील सिद्धेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीद्वारे जनजागृती केली. पर्यवेक्षक सीमा सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक बी. के. पवार यांचेही भाषण झाले. सहायक शिक्षक एन. एस. बागडे यांनी आभार मानले.
आधार मतिमंद विद्यालय
मालेगाव येथील आधार मतिमंद विद्यालयात अपंग महोत्सव साजरा करण्यात आला. सलाउद्दीन पाशा या अपंग कलाकाराचा नृत्य, योग शिक्षण व प्रशिक्षणाचा कार्यक्रम झाला. प्रांताधिकारी अजय मोरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून फेरीस प्रारंभ झाला. एकात्मता चौकातून निघालेल्या फेरीचा जिल्हा सत्र न्यायालयात समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश घाटगे यांचे भाषण झाले. यावेळी पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, संजय फतनानी, गोकुळ देवरे, सुधाकर निकम आदि उपस्थित होते.
निवासी अपंग कल्याण केंद्र
सटाणा येथील निवासी अपंग कल्याण केंद्रात विविध कार्यक्रमांनी अपंग दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी फेरी काढली. शाळेत क्रीडा, वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी एस. एम. गोडसे होते. मुख्याध्यापक ए. यू. धोंडगे यांनी सूत्रसंचालन केले.
नामपूर महाविद्यालय
नामपूर येथील एसपीएच कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात अपंग विद्यार्थी चंद्रभान पवार याचे विद्यार्थिनी सोनाली अहिरे, प्रियंका सूर्यवंशी, नूतन देवरे, माधुरी अहिरे यांनी औक्षण केले. प्राचार्य डॉ. दिनेश शिरुडे यांनी मनोगत व्यक्त केले.
जि. प. शाळा, ब्राह्मणगाव
ब्राह्मणगाव येथील जि. प. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढली. सरपंच सरला अहिरे, मुख्याध्यापक श्रीमती देवरे, विद्यार्थी व ग्रामस्थ फेरीत सहभागी झाले. शिक्षक पवार यांनी मार्गदर्शन केले.
विनय प्राथमिक शाळा
मालेगाव कॅम्पातील विनय मंदिर प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक धनंजय पाटील यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून जनजागृती केली. (लोकमत चमू)