वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक बायोइथिक दिन
By Admin | Updated: October 24, 2016 00:30 IST2016-10-24T00:29:39+5:302016-10-24T00:30:46+5:30
वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक बायोइथिक दिन

वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक बायोइथिक दिन
नाशिक : आडगाव येथील मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्रात जागतिक बायोइथिक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक पातळीवर १९ आॅक्टोबर हा दिवस जागतिक बायोइथिक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयातील बायोइथिक्स युनिटच्या वतीने हा दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या एमसीआय सभागृहात झालेल्या कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत संकलेचा उपस्थित होते. अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांनी प्रास्ताविक केले. यानिमित्ताने पोस्टर प्रदर्शन आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित पाटील, बॉयोइथिक्स युनिटचे सचिव डॉ. परीक्षित मुळे, सदस्य डॉ. नीता गांगुर्डे, वृषाली सूर्यकर व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)