स्मार्ट सिटीला वर्ल्ड बॅँकेचे सहाय्य?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:21 IST2017-08-23T23:31:13+5:302017-08-24T00:21:50+5:30
स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महाराष्टÑातील घोषित झालेल्या शहरांमध्ये राबविण्यात येणाºया प्रकल्पांना वर्ल्ड बॅँकेचे अर्थसहाय्य लाभण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात बुधवारी (दि.२३) मुंबईत वर्ल्ड बॅँकेच्या प्रतिनिधींची बैठक होऊन त्यात नाशिकच्या एसपीव्ही कंपनीनेही प्रकल्पांचे सादरीकरण केले.

स्मार्ट सिटीला वर्ल्ड बॅँकेचे सहाय्य?
नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महाराष्टÑातील घोषित झालेल्या शहरांमध्ये राबविण्यात येणाºया प्रकल्पांना वर्ल्ड बॅँकेचे अर्थसहाय्य लाभण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात बुधवारी (दि.२३) मुंबईत वर्ल्ड बॅँकेच्या प्रतिनिधींची बैठक होऊन त्यात नाशिकच्या एसपीव्ही कंपनीनेही प्रकल्पांचे सादरीकरण केले.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महाराष्टÑातील ११ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या शहरांनी तयार केलेल्या प्रकल्प आराखड्यानुसार काही शहरांमध्ये प्रत्यक्ष कामांनाही सुरुवात झाली आहे. सदर प्रकल्पांना काही अर्थसहाय्य करता येईल काय या उद्देशाने केंद्र सरकारने वर्ल्ड बॅँकेच्या प्रतिनिधींना महाराष्टÑातील स्मार्ट सिटी अभियानाचा आढावा घेण्यासाठी पाठविले आहे. बॅँकेच्या प्रतिनिधींसमवेत बुधवारी मुंबईत बैठक झाली. यावेळी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या कंपनीनेमार्फतही काही प्रकल्पांचे सादरीकरण झाले. या बैठकीला महापालिकेचे उपअभियंता सी. बी. अहेर तसेच कंपनीचे प्रकल्प सल्लागार, अभियंता उपस्थित होते. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत घोषित झालेल्या शहरांना केंद्र सरकारकडून ५० टक्के निधी मिळणार असून, २५ टक्के निधी राज्य शासनाकडून प्राप्त होणार आहे तर महापालिकेला २५ टक्के निधी उभारावा लागणार आहे. प्रतिवर्षी महापालिकेला सुमारे ५० कोटी रुपये उभे करावे लागणार आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत काही प्रकल्पांना वर्ल्ड बॅँकेमार्फत अर्थसाहाय्य करता येईल काय, याची चाचपणी केली जात आहे. महापालिकेने यापूर्वीच सिंहस्थ अनुदानातील न वापरलेला सुमारे ५० कोटींचा निधी स्मार्ट सिटीतील प्रकल्पांसाठी वर्ग करण्याची मागणी शासनाकडे केलेली आहे.
मोदींची व्हिडीओ कॉन्फरन्स स्थगित
स्मार्ट सिटीतील प्रकल्पांचा आढावा बुधवारी दुपारी ३.३० वाजता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेणार होते. परंतु, सदर व्हिडीओ कॉन्फरन्स स्थगित झाल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता व स्मार्ट सिटी कंपनीचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम पवार यांनी दिली. दरम्यान, स्मार्ट सिटी अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या कालिदास नूतनीकरणाच्या कामानंतर आता लवकरच नेहरू उद्यान व महात्मा फुले कलादालनाच्याही कामांना गती दिली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.