चित्तपावन मंचाची रविवारी कार्यशाळा

By Admin | Updated: August 15, 2014 00:38 IST2014-08-14T22:09:23+5:302014-08-15T00:38:51+5:30

चित्तपावन मंचाची रविवारी कार्यशाळा

Workshop on Chittapavan Forum Sunday | चित्तपावन मंचाची रविवारी कार्यशाळा

चित्तपावन मंचाची रविवारी कार्यशाळा

  नाशिक : येथील चित्तपावन उद्योजक मंचाचा सहावा वर्धापनदिन सोहळा रविवारी (दि.१७) सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आला असून, त्यानिमित्ताने युवकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. गंगापूररोडवरील कूर्तकोटी शंकराचार्य हॉल, शंकराचार्य संकुल येथे हा कार्यक्रम होणार असून, सकाळी दहा वाजता ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अजित रानडे, तर दुसऱ्या सत्रात डॉ. अजित मराठे, गिरीश टिळक हे बिझनेस नेटवर्किंग या विषयावर माहिती देणार आहेत. तिसऱ्या सत्रात विजय आठवले आणि तुषार मेहंदळे यांच्या मुलाखती सुधाकर जोगळेकर आणि डॉ. अजित मराठे घेतील, तर अश्विनी देशपांडे, मोहिनी केळकर यांचे अनुभव कथन होणार आहेत. या सत्राचे सूत्रधार महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष रामभाऊ भोगले हे असतील.

Web Title: Workshop on Chittapavan Forum Sunday