नांदूरमधमेश्वर येथे पक्षी अभ्यासाबाबत कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:24 IST2021-02-06T04:24:46+5:302021-02-06T04:24:46+5:30
या कार्यशाळेत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, शिक्षण सहा. संचालक डॉ. राजू कसांब. पक्षीशास्त्रज्ञ तुहिना कटटी, शिक्षण कार्यक्रम अधिकारी नंदकिशोर ...

नांदूरमधमेश्वर येथे पक्षी अभ्यासाबाबत कार्यशाळा
या कार्यशाळेत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, शिक्षण सहा. संचालक डॉ. राजू कसांब. पक्षीशास्त्रज्ञ तुहिना कटटी, शिक्षण कार्यक्रम अधिकारी नंदकिशोर दुधे, प्रियंका जुंदरे, डॉ. जयंत वडतकर, किरण मोर, सतीश गोगटे सहभागी झाले होते. त्यांनी पाच दिवसांत पक्ष्यांचा नांदूरमधमेश्वरमधील अधिवास महत्व, पक्षी निरीक्षण व पक्षीओळख, रामसर पाणथळाचे महत्व, बर्ड रिंगीग व बँडिंग, पक्षी प्रगणना, पक्षी स्थलांतराचे माग आणि महत्व, पाणथळ जागांचे पर्यावरणातील महत्व व संरक्षण, संवर्धन, माळरानातील पक्षीजीवन, रानपिंगळ्याचा पुन:शोध अशा विविध विषयांवर चर्चासत्र पार पडले. सहभागी प्रशिक्षणार्थीना पक्षीअभ्यासाचे संदर्भ ग्रंथ तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी कोठुरे येथील पक्षीमित्र शरद चांदोरे, रोहन मोगल आदींसह गोदाकाठ भागातील पक्षीमित्र उपस्थित होते.