महिला-बालकांच्या विकासासाठी कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:34 IST2017-09-26T23:49:41+5:302017-09-27T00:34:34+5:30

समाजातील गोरगरीब महिला, मुले यांच्यासाठी काहीतरी करावे या हेतुने डॉ. अनिता दराडे यांनी २०१० पासून लहान-मोठे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. त्यांचे सामाजिक काम पाहून त्यांना मिळत गेलेल्या मैत्रिणी, सुचत गेलेले कार्यक्रमातून कामाचा पसारा वाढत गेला. त्यातून संस्थेची स्थापना करण्याचा विचार पुढे आला. सक्षम संघटन नावाने संस्थेचे काम अधिक जोमाने सुरू झाले.

Working for the development of women and children | महिला-बालकांच्या विकासासाठी कार्यरत

महिला-बालकांच्या विकासासाठी कार्यरत

सक्षम  संघटन
परिचय महिला संस्थांचा
समाजातील गोरगरीब महिला, मुले यांच्यासाठी काहीतरी करावे या हेतुने डॉ. अनिता दराडे यांनी २०१० पासून लहान-मोठे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. त्यांचे सामाजिक काम पाहून त्यांना मिळत गेलेल्या मैत्रिणी, सुचत गेलेले कार्यक्रमातून कामाचा पसारा वाढत गेला. त्यातून संस्थेची स्थापना करण्याचा विचार पुढे आला. सक्षम संघटन नावाने संस्थेचे काम अधिक जोमाने सुरू झाले.  या संस्थेतर्फे प्रारंभापासून नेत्रतपासणी, हाडांची घना तपासणी शिबिर, महिला आरोग्य तपासणी शिबिर, बालरोग तपासणी शिबिर आदी विविध आरोग्य शिबिरे भरविली जात असून, आरोग्य तपासणीबरोबरच त्यांच्यासाठी जनजागृती शिबिरही भरविले जात आहे. संस्थेतर्फे प्रत्येक महिन्यात झोपडपट्टी भागातील शाळांमध्ये मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले जाते. या जनजागृती कार्यक्रमावेळी त्यांच्या मातांनाही आवर्जून बोलावून घेतले जाते. सध्या संस्थेत दराडे यांच्याबरोबर नेहा तिवारी, पायल राव, खुशाली शहा, सचिन कोळपकर, प्राची शहा आदि ३०-३५ कार्यकर्ते सक्रिय सहभाग देत आहेत. संस्थेतर्फे काही दिवसांपूर्वी तवलीफाटा येथील मतिमंद शाळेतील मुलांना जेवण, कपडे वाटप, वस्तू वाटप करण्यात आले. पेठ, सुरगाणासारख्या आदिवासी भागात आदिवासी बांधवांना कपडे, चादरी, शाळेचे साहित्य दिले जाते. तेथील लहान मुले, महिला, म्हाताºया व्यक्तींना निरनिराळ्या आजारांसाठी मोफत लसीकरण केले जाते. तपोवनातील वात्सल्य वृद्धाश्रमात किराणा सामान देण्यात आले. संस्थेतर्फे महिन्यातून एकदा जनजागृतीपर कार्यक्रम घेतला जात असून, लवकरच शहरातील २०० अंध बांधवांना काठ्या देण्याचे नियोजन आहे. सध्या शहर पोलिसांतर्फे राबविल्या जाणाºया सायबर जनजागृती कार्यक्रमात संस्था सहभाग देत असून, संस्थेतर्फे तीन शाळांमध्ये ही कार्यशाळा घेण्यात आली. या विविध समाजोपयोगी कामांसाठी सदस्य दरमहा स्वत: पैसे जमा करत निधी उभा करतात. भविष्यात संस्थेच्या कामाचे स्वरूप अधिक ठोस करण्यावर भर दिला जाणार आहे.

 

Web Title: Working for the development of women and children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.