कामगारांच्या वारसांना आता ‘कॅशलेस मेडिकल
By Admin | Updated: July 20, 2014 01:48 IST2014-07-19T22:24:34+5:302014-07-20T01:48:20+5:30
कामगारांच्या वारसांना आता ‘कॅशलेस मेडिकल

कामगारांच्या वारसांना आता ‘कॅशलेस मेडिकल
’नाशिकरोड : आयएसपी-सीएनपी मधील १ नोव्हेंबर २००८ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना किंवा मृत झालेल्या कामगारांच्या वारसांना मुद्रणालय महामंडळाकडून आयएसपी हॉस्पिटलसह इनपॅनल हॉस्पिटलमध्ये ‘कॅशलेस मेडिकल सुविधा’ मिळवून देण्यास मजदूर संघाला यश आल्याची माहिती संघाचे कार्याध्यक्ष जगदीश गोडसे यांनी दिली.
आयएसपी मजदूर संघाचे कार्याध्यक्ष जगदीश गोडसे, उपाध्यक्ष माधवराव लहांगे, ईपीएफ ट्रस्टी ज्ञानेश्वर जुंद्रे, सहसचिव सुनील अहिरे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर व देशातील इतर सात युनिटच्या पदाधिकाऱ्यांनी मुद्रणालय महामंडळ प्रशासनासोबत गेल्या अनेक दिवसांपासून सेवानिवृत्त कामगार व वारसांना कॅशलेस मेडिकल सुविधा मिळावी म्हणून प्रयत्न सुरू ठेवले होते.
याबाबत मजदूर संघ पदाधिकारी व महामंडळ प्रशासनाच्या संयुक्त झालेल्या बैठकीत १ नोव्हेंबर २००८ पासून सेवानिवृत्त झालेल्या व मृत कामगारांच्या वारसांना आयएसपी हॉस्पिटलसह इनपॅनल हॉस्पिटलमध्ये कॅशलेस मेडिकल सुविधा देण्याचे मान्य करण्यात आल्याचे मजदूर संघाचे कार्याध्यक्ष जगदीश गोडसे यांनी सांगितले. ज्या कामगारांनी पेन्शनमध्ये ३०० रुपये वैद्यकीय भत्ता घेतलेला नाही, जे कामगार सी.जी.एच.एस. कार्ड घेऊन वैद्यकीय सुविधा घेत नाही अशा सर्व कामगारांना मुद्रणालय महामंडळ सेवानिवृत्त मेडिकल पॉलिसीचा लाभ मिळणार आहे. सी.जी.एच.एस. कार्डचा आॅप्शन घेणाऱ्या कामगारांना नियमाप्रमाणे शेवटच्या बेसिक व डी. ए. इतकी रक्कम भरावी लागणार आहे. इनपॅनल हॉस्पिटलची सुविधा घेणाऱ्या कामगारांना शेवटच्या बेसिक व डी.ए.ची रक्कम भरावी लागू नये म्हणून ग्रेड-पेप्रमाणे कमीत कमी रक्कम दहा वर्षांचा कालावधी धरून वन टाइम रक्कम भरून लाइफ टाइम कॅशलेश सुविधा मिळावी या मागणीप्रमाणे पॉलिसी मंजूर केली आहे.
सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पुढील महिन्यात स्वातंत्र्य दिनापासून पॉलिसीच्या अंमलबजावणीस प्रारंभ होणार आहे. सेवानिवृत्त कामगार व मयत कामगारांच्या वारसांनी येत्या सोमवारपासून मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून आॅप्शन फॉर्म मजदूर संघाच्या प्रतिनिधीकडून घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)