मध्य प्रदेशकडे जाणाºया मजुरांना अडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 22:56 IST2020-03-30T22:52:26+5:302020-03-30T22:56:00+5:30
नांदगाव : दळणवळणाच्या सुविधा बंद असल्याने आपल्या गावी जाण्यासाठी पायी निघालेल्या सुमारे वीस जणांना येथे अडविण्यात येऊन त्यांची सोय सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाच्या निवास शिबिरात करण्यात आली. तसेच तीन चाकी सायकलवर बुलडाणा येथे निघालेला दिव्यांग तरु ण व त्याची मतिमंद बहीण यांचादेखील आजच्या व्यक्तींमध्ये समावेश आहे. दरम्यान, आंतरजिल्हा सीमेवरील चेकपोस्टला बगल देऊन तालुक्यात प्रवेश केलेल्या व्यक्तींच्या मागावर पोलीस आहेत.

मध्य प्रदेशातील बºहाणपूरकडे पायी जाणाऱ्या मजुरांना नांदगावला अडविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव : दळणवळणाच्या सुविधा बंद असल्याने आपल्या गावी जाण्यासाठी पायी निघालेल्या सुमारे वीस जणांना येथे अडविण्यात येऊन त्यांची सोय सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाच्या निवास शिबिरात करण्यात आली. तसेच तीन चाकी सायकलवर बुलडाणा येथे निघालेला दिव्यांग तरु ण व त्याची मतिमंद बहीण यांचादेखील आजच्या व्यक्तींमध्ये समावेश आहे. दरम्यान, आंतरजिल्हा सीमेवरील चेकपोस्टला बगल देऊन तालुक्यात प्रवेश केलेल्या व्यक्तींच्या मागावर पोलीस आहेत.
सोमवारी थांबविण्यात आलेले बहुतांश मजूर नाशिकरोडला मालधक्क्यावर मजुरीचे काम करणारे असून, ते मध्य प्रदेशातील गावाकडे पायपीट करत निघाले आहेत. दुपारी शहरातील राज्यमार्गावरून जात असताना शनिमंदिर परिसरातील पुलावर ते दोघांना दिसले.
कोरोनामुळे जगभरात राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या असून, संपूर्ण भारतात लॉकडाउन आहे.
हिरे व विसपुते यांनी प्रभारी तहसीलदार योगेश जमदाडे यांना कळविल्यानंतर त्यांनी या मजुरांना निवारा शिबिरात दाखल केले. दाखल केल्यावर या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.स्वयंसेवी संस्थेमार्फत मदतकार्य सोमवारी सकाळपासूनच शहराच्या विविध राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्गावर पायपीट करणाºयांची चौकशी सुरु होती. चोपडा, अमळनेर, औरंगाबाद आदी भागाकडे जात असलेल्या काहीजणांना या शिबिरात आणले. सायंकाळी दाखल झालेल्या लोकांची संख्या वीसपर्यंत होती. या सर्वांना झोपण्यासाठी गाद्या, पांघरण्यासाठी ब्लॅँकेट, टूथपेस्ट, ब्रश व जेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. शहरातील स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींनीही मदत केली.