कार्यकर्त्यांनी स्वबळावर कॉँग्रेसचा झेंडा फडकवावा

By Admin | Updated: October 22, 2016 22:58 IST2016-10-22T22:57:49+5:302016-10-22T22:58:31+5:30

राजाराम पानगव्हाणे : कॉँग्रेसचा मेळावा, ३५ उमेदवारांच्या मुलाखती; राष्ट्रवादीवर टीकेची झोड

Workers should flag the flag of the Congress | कार्यकर्त्यांनी स्वबळावर कॉँग्रेसचा झेंडा फडकवावा

कार्यकर्त्यांनी स्वबळावर कॉँग्रेसचा झेंडा फडकवावा

येवला : भाजपाच्या अच्छे दिनचे स्वप्न हवेत विरले तर राष्ट्रवादीने शहर भकास करून शहरवासीयांची निराशा केली. त्यामुळे शहर विकासासाठी आता पालिका निवडणुकीत कॉँग्रेस शिवाय पर्याय नाही, त्यामुळे एकजुटीने कामाला लागा आणि स्वबळावर काँग्रेस पक्षाचा झेंडा पालिकेवर फडकवण्यासाठी परिश्रम घ्या, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी केले. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्टेशन रस्त्यावरील एका सभागृहात कॉँग्रेस पक्षाने सभेचे आयोजन केले होते. या सभेत पानगव्हाणे बोलत होते. येथील सभागृहात पालिकेत प्रभागनिहाय इच्छुक असलेल्या उमेदवाराच्या मुलाखती यावेळी घेण्यात आल्या.
शहरात रस्त्यांची झालेली दुरवस्था, व्यापाराना विस्थापित करण्याचे राष्ट्रवादीचे धोरण, तर भाजपाने मुंगेरीलाल के हसीन सपने दाखवणारे भाजप यांनी घोर निराशा केली असल्याची टीका पानगव्हाणे यांनी केली.
राष्ट्रवादीने सन्मानजनक जागा दिल्या तरच युती करण्याची काँग्रेसची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. गुणवंत होळकर, विकास चांदर यांना येवला पक्ष निरीक्षक म्हणून नेमणूक केल्याचे पक्षाने यावेळी स्पष्ट केले.
व्यासपीठावर तालुकाध्यक्ष अरुण अहेर, शहर अध्यक्ष राजेश भंडारी, सुरेश गोंधळी, समीर देशमुख, बळीराम दादा शिंदे, फारूक शेख, जमीर पीरजादे, फारुकी शेख, जरार पहिलवान, रश्मी पालवे, तेहसीन बानो, उस्मान शेख होते. बैठकीचे प्रास्ताविक नानासाहेब शिंदे यांनी केले. मेळाव्यास प्रनिताराजे शिंदे, राजेंद्र गणोरे, गोरखनाथ खोकले, संजय वाळुंज, अण्णा पवार, विमल अहेर, रुख्साना शेख, सीमा बोडके, नसीर शेख, मंगल परदेशी, नूरा शेख, सविता गणोरे, अनिल गोसावी, मुकेश पाटोदकर, संजय शिंदे, अर्चना शिंदे, सनाउल्ला गाझी, चांगदेव खैरे, रमा लाघवे, राजे आबासाहेब शिंदे, आत्मेश
भायभंग, शबाना मन्सुरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस पक्षाकडे एकूण ५२ उमेदवारांनी उमेदवारी मागितली. यापैकी ३५ उमेदवारांनी नाशिक येथे मुलाखती दिल्या. (वार्ताहर)
 

Web Title: Workers should flag the flag of the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.