मराठा मोर्चात हजारोंच्या संख्येने कामगार सहभागी
By Admin | Updated: September 25, 2016 00:05 IST2016-09-25T00:04:43+5:302016-09-25T00:05:11+5:30
मराठा मोर्चात हजारोंच्या संख्येने कामगार सहभागी

मराठा मोर्चात हजारोंच्या संख्येने कामगार सहभागी
सातपूर : सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीला शनिवारी साप्ताहिक सुटी असल्याने या सुटीचे औचित्य साधत मराठा क्रांती मूक मोर्चात हजारोंच्या संख्येने कामगार सहभागी झाले होते. कोपर्डीतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अॅट्रॉसिटीचा होणारा गैरवापर थांबवा या प्रमुख मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी शहरात मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चा यशस्वी करण्यासाठी सातपूर विभागात ठिकठिकाणी बैठका घेऊन, दुचाकींची रॅली काढून शक्तिप्रदर्शन करीत जनजागृती करण्यात आली होती. शनिवारी सकाळपासूनच सातपूर विभागातून मराठा समाजाचे नेते, कार्यकर्ते, महिला, युवती, युवकांसह अन्य समाजदेखील मोर्चात सहभागी होण्यासाठी मिळेल त्या वाहनाने रवाना झाले होते. परिसरातून हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)