शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीतील तांबे चोरी प्रकरणी कामगारांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 16:04 IST

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतील तिघा कामगारांनी सतरा किलो ताब्यांच्या टिकल्या चोरून नेल्याची घटना घडली आहे़

ठळक मुद्देपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतील तिघा कामगारांनी सतरा किलो ताब्यांच्या टिकल्या चोरून नेल्याची घटना घडली आहे़

सचिन इंडस्ट्रिजमधील ज्ञानेश्वर उगले यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून कंपनीतील संशयित कामगार गंगाधर घोटेकर (रा. चांदोरी), प्रदीप सोनुने (रा. खंडावा) व योगेश भवर (रा. सायखेडा़, सध्या रा़ शिवाजीनगर) यांनी बुधवारी (दि़ ५) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ५ हजार ९५० रुपये किमतीच्या १७ किलो वजनाच्या तांब्याच्या टिकल्या चोरून नेल्या़ या प्रकरणी तीन कामगारांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या तिघांनाही अटक केली आहे़लेखानगरजवळ झाडांची कत्तलनाशिक : लेखानगरमधील मिलिटरी कर्मचारी वसाहतीत अज्ञात संशयितांनी बेकायदेशीरपणे नऊ वृक्षांची कत्तल तर तेरा वृक्षांचा विस्तार कमी केल्याची घटना घडली आहे. विस्तार कमी केलेल्या वृक्षांमध्ये तीन आंबा, दोन उंबर, एक बोर, दोन सुबाभूळ, एक अशोका, एक रामफळ व दोन पिंपळ यांचा समावेश असून दोन उंबर, पाच सुबाभूळ, एक विलायती चिंच, एक निलगिरी अशी एकूण नऊ वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे़ या प्रकरणी प्रकाश चौकुटे (रा़ पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठारनाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत सातपूरच्या प्रबुद्धनगरमधील इसमाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़६) सकाळच्या सुमारास सातपूरच्या अंबिका स्वीट्सजवळील वेताळ बाबा मंदिराजवळ घडली़ सीताराम श्यामराव डावरे (४२) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़ या अपघातात डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने जखमी झालेल्या डावरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे़गंधर्वनगरीत चोरीनाशिक : उपनगर गंधर्वनगरी परिसरातील ममता रेसिडेन्सीतील रहिवासी जयप्रकाश गवांदे (मूळ रा़ गणेश प्रसाद सोसायटी,दहीसर, मुंबई) हे पत्नीसह मुंबईला गेले होते़ चोरट्यांनी गवांदे यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील पैठणी साड्या, ब्लँकेट, चष्मा अशा हजारो रुपयांच्या विविध वस्तू चोरून नेल्या़ य प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़बॅट-यांची चोरीनाशिक : लवाटेनगरमधील रहिवासी गोरख मोरे यांच्या टिप्पर गाडीमध्ये बसविलेल्या २० हजार रुपये किमतीच्या दोन अ‍ॅमरॉन कंपनीच्या बॅट-या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़दुचाकीची चोरीनाशिक : पाथर्डी फाट्यावरील वासननगरमधील रहिवासी महेंद्र कोरी यांची दहा हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी (एमएच १५, बीएफ ९५३४) चोरट्यांनी घराजवळून चोरून नेली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस