वाहनाच्या धडकेने कामगार ठार
By Admin | Updated: August 7, 2015 23:37 IST2015-08-07T23:31:06+5:302015-08-07T23:37:46+5:30
वाहनाच्या धडकेने कामगार ठार

वाहनाच्या धडकेने कामगार ठार
नाशिकरोड : जेलरोड भीमनगर येथून वळणाऱ्या मुद्रणालय कामगाराच्या दुचाकीस एअर फोर्सच्या वाहनाने दिलेल्या धडकेत कैलास सावंत जागीच ठार झाले.
चलार्थ पत्र मुद्रणालयातील कामगार कैलास तुकाराम सावंत (वय ५१, रा. जिजामातानगर) हे शुक्रवारी दुपारी ११.४५च्या सुमारास मुद्रणालयातून दुचाकी (एमएच १५ सीएन ६७७१)वरून घरी जाण्यास निघाले. सावंत जेलरोड के. एन. केला शाळेसमोर बिटकोच्या दिशेने वळत असताना बिटकोकडून आलेल्या एअरफोर्सच्या ट्रकने (१४ डी १९३६३९ एम) दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. वाहनचालकाने जखमी सावंत यांना बिटको रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. (प्रतिनिधी)