ट्रकच्या धडकेत कामगार ठार

By Admin | Updated: February 4, 2016 23:08 IST2016-02-04T23:05:19+5:302016-02-04T23:08:44+5:30

ट्रकच्या धडकेत कामगार ठार

Workers killed in truck shock | ट्रकच्या धडकेत कामगार ठार

ट्रकच्या धडकेत कामगार ठार

 सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीत ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार कामगार ठार झाल्याची घटना घडली असून, याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजीवनगर येथील संदीपकुमार शिवभगत (२२) हा दुचाकीने (एमएच १५ बीवाय ६१८५) कामावरून घरी जात होता. याचदरम्यान पाठीमागून आलेल्या ट्रकने (एमएच-१५-बीजे ७८८८) धडक दिली. यात संदीपकुमार यास गंभीर दुखापत झाल्याने त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु उपचारापूर्वीच त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. (वार्ताहर)

Web Title: Workers killed in truck shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.