कष्टकरी महिलांचा सत्कार सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:35 IST2017-08-30T00:35:13+5:302017-08-30T00:35:13+5:30
येथील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या १७व्या वर्धापन दिनानिमित्त वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांना स्वच्छतादूत ही पदवी देण्यात आली, तर धुणी-भांडी करणाºया महिलांचा सत्कार करण्यात आला. जुने सिडको येथील स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलातील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, मनपा सभागृहनेता दिनकर पाटील, नगरसेवक राजेंद्र महाले, प्रवीण तिदमे, माजी नगरसेवक चंद्रकांत पांडे, कल्पना पांडे, कल्पना चुंभळे आदी उपस्थित होते.

कष्टकरी महिलांचा सत्कार सोहळा
सिडको : येथील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या १७व्या वर्धापन दिनानिमित्त वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांना स्वच्छतादूत ही पदवी देण्यात आली, तर धुणी-भांडी करणाºया महिलांचा सत्कार करण्यात आला.
जुने सिडको येथील स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलातील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, मनपा सभागृहनेता दिनकर पाटील, नगरसेवक राजेंद्र महाले, प्रवीण तिदमे, माजी नगरसेवक चंद्रकांत पांडे, कल्पना पांडे, कल्पना चुंभळे आदी उपस्थित होते. यावेळी गरीब कुटुंबातील धुणी-भांडी करणाºया महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सीमा हिरे, दिनकर पाटील यांसह प्रभागातील नगरसेवक राजेंद्र महाले, प्रवीण तिदमे, कल्पना पांडे व कल्पना चुंभळे यांनी मनोगतात ज्येष्ठांना सर्वतोपरी सहकार्य करून आवश्यक त्या सेवासुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले. यावेळी मंडळास स्टील कपाट, दोन टेबल भेट देणाºया रमेश सोनवणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कवी रवींद्र मालुंजकरांनी कवितेतील हास्ययोग सादर करीत ज्येष्ठांना हसविले. शिक्षणतज्ज्ञ डॉ. शांताराम रायते यांनी जीवनानंद व विज्ञान या विषयावर मार्मिक दृष्टांत दिले. स्वागत दिनकर शेळके व रमेश सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन सावळीराम तिदमे यांनी तर आभार जयराम गवळी यांनी मानले. याप्रसंगी सुखदेव भामरे, आत्माराम देसले, विजय गोसावी, सुधाकर सोनार, प्रकाश काळे, प्रमिला पांडे, नंदकुमार दुसानिस, देवराम सैंदाणे, रमेश बागुल आदी उपस्थित होते.