‘क्रीडा साधना’तर्फे कामगारांचा सत्कार
By Admin | Updated: May 4, 2016 00:52 IST2016-05-04T00:02:16+5:302016-05-04T00:52:06+5:30
‘क्रीडा साधना’तर्फे कामगारांचा सत्कार

‘क्रीडा साधना’तर्फे कामगारांचा सत्कार
नाशिक : येथील कालिका मंदिर ट्रस्ट व क्रीडा साधना यांच्यातर्फेजागतिक कामगार दिनानिमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कामगारांना उत्कृष्ट कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. कालिका मंदिराच्या हॉलमध्ये या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सोनाली आंबिलवादे (शासकीय सेवा), काशीनाथ साळवे आणि तानाजी पाटील (व्ही.आय.पी.), दीपक लोखंडे (म.न.पा. नाशिक), विलास गांगुर्डे आणि शिरीष खाडे (दोघेही करन्सी नोट प्रेस), मनोज म्हस्के (जिल्हा परिषद), शरद पाटील (सिएट), सदाशिव नाईक, चेतन पणेर आणि अंबादास जगताप (सर्व मायको), चंद्रकांत सूर्यवंशी (महिंद्रा) जगन तिडके (क्रॉम्प्टन) यांचा समावेश होता. कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र बागुल, दीपक पाटील, उद्योजक रमेश पवार, केशव पाटील, सुभाष तलाजिया, अशोक दुधारे आदि मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थींना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्र माच्या वेळी नाशिकच्या जम्परोपच्या खेळाडूंनी प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी जम्मू-काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल अनिमेश भावसार आणि आयुष मानकर या जम्परोपच्या खेळाडूंचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)