प्रभाग समित्यांवर कार्यकर्त्यांना संधी?

By Admin | Updated: April 9, 2017 00:09 IST2017-04-09T00:09:37+5:302017-04-09T00:09:47+5:30

नाशिक : महापालिकेत भाजपाने कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी प्रभाग समित्यांवरही प्रत्येकी २ सदस्य नियुक्त करण्याच्या दृष्टीने विचार सुरू केला आहे.

Workers' association on ward committees? | प्रभाग समित्यांवर कार्यकर्त्यांना संधी?

प्रभाग समित्यांवर कार्यकर्त्यांना संधी?

नाशिक : महापालिकेत सत्तारूढ झालेल्या भाजपाने कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी प्रभाग समित्यांवरही प्रत्येकी २ सदस्य नियुक्त करण्याच्या दृष्टीने विचार सुरू केला आहे. त्यामुळे उपेक्षित कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या प्रभाग समित्यांवर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन अ‍ॅक्टनुसार दोन सदस्य हे सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थांमधून नेमण्याची तरतूद आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन अ‍ॅक्ट कलम १९४९ चे कलम २९ अ मधील २ (क) नुसार एक सदस्य सामाजिक कार्यकर्त्यांमधून तर एक सदस्य एनजीओ संस्थेतून घेण्याची तरतूद आहे. सदर तरतूद ही ३० मे १९९५ पासून आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन अ‍ॅक्टमध्ये सदर तरतूद असतानाही महाराष्ट्रातील कोणत्याही महानगरपालिकेने कलम २९ अ मधील २ क नुसार सदस्यांची नेमणूक केलेली नाही. सदर सदस्यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाला दिशा देणे हाच या तरतुदीमागचा उद्देश आहे, परंतु त्याची दखल महापालिकेने घेतलेली नाही.
दरवेळी प्रभाग समित्यांवर सदर दोन सदस्य नियुक्त करण्यासंबंधी चर्चा केली जाते, परंतु त्याबाबत अंमलबजावणी मात्र होत नाही. सत्ताधारी पक्षाकडूनही त्याबाबत फारसे गांभीर्याने घेतले गेले नाही. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. महापालिकेत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना सत्तापदांचा लाभ होणार आहे.
परंतु, कार्यकर्त्यांनी संधी मिळेल, अशी पदे नाहीत. त्यामुळेच कार्यकर्त्यांनाही स्थान मिळावे यासाठी भाजपाने सहाही प्रभाग समित्यांवर प्रत्येकी दोन सदस्य कार्यकर्त्यांमधून नियुक्त करण्याच्या दृष्टीने विचार सुरू केला आहे. स्थायी समितीच्या सभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आता प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित होणार असून तत्पूर्वी, त्यासाठी महासभेची मान्यता घेतली जाणार आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात प्रभाग समिती सभापतिपदाचा निवडणूक कार्यक्रम लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Workers' association on ward committees?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.