अजंग रस्त्याचे काम काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:40 PM2020-02-23T23:40:30+5:302020-02-24T00:49:41+5:30

गेल्या दीड वर्षभरात अठरा जणांच्या निष्पाप वाहनचालकांचा बळी घेणारा अजंग- मालेगाव रस्त्याची सुधारणा कधी होईल असा प्रश्न विचारला जात होता. अजंग ते मालेगाव रस्त्याचा प्रवास जीवघेणा ठरत अनेक लहान-मोठ्या अपघातांना दररोज निमंत्रण मिळत होते. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत होता.

The work of the unfamiliar road began | अजंग रस्त्याचे काम काम सुरू

मालेगाव ते अजंग रस्त्याचे सुरु झालेली काम़्र

Next
ठळक मुद्देप्रशासनास आली जाग : राजगड प्रतिष्ठानच्या आंदोलनाचा परिणाम

वडनेर : गेल्या दीड वर्षभरात अठरा जणांच्या निष्पाप वाहनचालकांचा बळी घेणारा अजंग- मालेगाव रस्त्याची सुधारणा कधी होईल असा प्रश्न विचारला जात होता. अजंग ते मालेगाव रस्त्याचा प्रवास जीवघेणा ठरत अनेक लहान-मोठ्या अपघातांना दररोज निमंत्रण मिळत होते. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत होता.
या रस्त्यासाठी राजगड प्रतिष्ठानच्या आंदोलनास यश मिळाले असून रस्त्याचे काम अखेर सुरू करण्यात आल्याने वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ‘लोकमत’ने याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून रस्त्याची दुरवस्था मांडली होती. अजंग ते मालेगाव या राज्यमार्गाच्या रखडलेल्या कामासाठी अजंग येथे प्रशांतनगर बायपास जवळ, राजगड प्रतिष्ठाण, मातोश्री रिक्षा चालक-मालक संघटना व ग्रामस्थांमार्फत दीड महिन्यापूर्वी आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. अजंग ते मालेगाव या रस्त्याच्या रूंदीकरणाच्या नावाखाली दहा ते अकरा महिन्यांपासून रस्ता दोन्ही बाजूंना खोदून ठेवला आहे. अरूंद रस्त्यावर वाहतूक सुरू असल्याने वापरण्यात येणारा रस्ताही खराब झाला आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हाच प्रश्न निर्माण झाला असून, या रस्त्याच्या कामाबाबत यापूर्वीही अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आली आहेत.
यानंतर थातुरमातुर डागडुजी करीत कामाला सुरुवात करण्यात आली व लगेचच काम पुन्हा बंद झाले. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे यापूर्वीही अनेकदा अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शिवाय अनेक लोक जखमीही झाले आहेत, मात्र तरीही संबंधित खात्याने अजंग-मालेगाव रस्ता रुंदीकरणाच्या कामात दिरंगाई करीत वेळकाढूपणा केल्यामुळे निषेध करण्यासाठी व रस्ता दुरुस्तीच्या कामास गती मिळावी तसेच एक ते दीड वर्षात अठरा जणांनी आपला जीव गमावला असून, अजून किती जणांच्या जिवांची वाट पाहत आहेत असा संतप्त सवाल व राजगड प्रतिष्ठानचे राहुल पवार, सुनील शेलार, रवि कन्नोर, भूषण बागुल आदींनी उपस्थित केला होता.

ठेकेदाराने लवकरच काम सुरू करण्याचे दिले आश्वासन
निवेदन देऊन पंधरा ते वीस दिवस उलटल्यानंतरही सदर रस्त्याच्या कामाबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषण करण्याचा निर्णय अजंग व वडेल ग्रामस्थांनी घेतला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर संबधित ठेकेदाराने लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन देत लेखी पत्र देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती.

Web Title: The work of the unfamiliar road began

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.