शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

महानुभाव पंथाद्वारे भक्तिमार्गातील क्रांतिकारक विचार मांडण्याचे कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:51 IST

महानुभावपंथाच्या माध्यमातून गेल्या साडेसातशे वर्षांपासून सातत्याने भक्तीमार्गातील क्रांतीकारक विचार मांडण्याचे कार्य करण्यात येत आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पंथाचे आचार्य, संत-महंत आणि साधक यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळेच केवळ खेड्यापाड्यातच नव्हे तर आदिवसी वाड्या-वस्त्यात पंथाचे समतावादी आणि व्यसनमुक्तीचे विचार पोहचले आहेत, असे प्रतिपादन उपाध्यकुलाचार्य आचार्य प्रवर महंत वर्धनस्त बीडकरबाबाशास्त्री यांनी केले.

ठळक मुद्देबीडकरबाबा शास्त्री : जिव्हाळे येथे श्री चक्रधरस्वामी जयंती सोहळा

नाशिक : महानुभावपंथाच्या माध्यमातून गेल्या साडेसातशे वर्षांपासून सातत्याने भक्तीमार्गातील क्रांतीकारक विचार मांडण्याचे कार्य करण्यात येत आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पंथाचे आचार्य, संत-महंत आणि साधक यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळेच केवळ खेड्यापाड्यातच नव्हे तर आदिवसी वाड्या-वस्त्यात पंथाचे समतावादी आणि व्यसनमुक्तीचे विचार पोहचले आहेत, असे प्रतिपादन उपाध्यकुलाचार्य आचार्य प्रवर महंत वर्धनस्त बीडकरबाबाशास्त्री यांनी केले.जिव्हाळे (ता. निफाड) येथे मंगळवारी (दि. ११) भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती उत्सवानिमित्तआयोजित धर्मसभेत महंत वर्धनस्त बीडकर बाबा शास्त्री अध्यक्षस्थानावरून बोलत होते. भगवान श्रीचक्रधर स्वामी यांनी तत्कालीन समाजातील अंधश्रद्धा आणि जुनाट रूढी-परंपरा यांच्यावर आघात करून सर्वसामान्य जनतेला आणि तळागाळातील समाजातील एक नव्या भक्तीमार्गाची वाट दाखविली. या भक्तीमार्गाचे तत्वज्ञान त्यांनी अत्यंत साध्या सोप्या बोलीभाषेत म्हणजे मराठीत समजावून सांगितले. त्याच कार्याने गेल्या सात दशकापासून पंथाचीवाटचाल सुरू आहे, असेही महंतबीडकर शास्त्री यांनी नमूद केल.याप्रसंी महंतजायराज बाबा विराट यांनी आपल्या व्याख्यानात पंचकृष्ण अवतार परंपरेची माहितीसांगून श्रीचक्रधरस्वामी यांचे विचार आचरणात आणण्याचे साधकांना आवाहन केले.याप्रसंगी व्यासपीठावर आचार्य महंत सुकेणेकर बाबा शास्त्री, विनयमुनी पंजाबी, आचार्या महंत सुभद्राबाई शास्त्री कपाटे, अंजनगावकर बाबा, गोपालमुनी पंजाबी, आचार्य मानेकर दादाजी, महंत आंबेकर बाबा आदिंसह संत महंत उपस्थित होते.सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त विविध उपक्रमच्नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने भगवान श्रीचक्रधर स्वामी जयंती उत्सव सोहळा गेल्या ५० वर्षांपासून नियमितपणे साजरा करण्यात येत आहे. या सुवर्ण महोत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. ‘सुवर्णपुष्प’ या सुवर्ण महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ‘आजचा दिन आम्हा सोनियाचा’ पत्रिका प्रकाशित करण्यात आली.तसेच यावेळी आमदार अनिल कदम, आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार दिलीप बनकर, जि. प. अध्यक्ष शितल सांगळे, उद्योजक शांतीलाल जैन, प्रकाश नन्नावरे, अ‍ॅड.पांडुरंग बोधले, आदिंसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी संतमहंतांचा उत्सव समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष वामनराव आवारे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले. कार्यक्रमास नाशिक, जळगाव, औरंगाबाद, अमरावती आदि जिल्ह्यातील संत-महंत व भाविक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक