देवळा : उमराणा सजेचे तलाठी एस. एस. पवार यांचे निलंबन मागे घेण्यासाठी देवळा व चांदवड तालुक्यातील तलाठी व मंडल अधिकारी यांनी सोमवारी (दि.१२) सुरू केलेले बेमुदत काम बंद आंदोलन जिल्हाधिकारी यांनी सदरच्या निलंबनाबाबत व्यक्तिगत लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष उगले यांनी दिली आहे.अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक यावर प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याचा ठपका ठेवत चांदवडचे उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी उमराणाचे तलाठी एस. एस. पवार यांना निलंबित करण्याचा आदेश दि. २५ जून रोजी काढला होता. हे निलंबन अन्यायकारक असून ते मागे घेण्यात यावे यासाठी देवळा व चांदवड तालुक्यातील तलाठी संघटनांनी निवेदनाद्वारे मागणी केली होती.परंतु याबाबत योग्य ती दखल न घेतल्यामुळे तलाठी व मंडल अधिकारी यांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू करून आपल्या डिजिटल स्वाक्षऱ्या तहसीलदारांकडे जमा केल्या होत्या. शेतकरी पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी १५ जुलै हि अखेरची मुदत होती. तलाठ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होऊन अनेक शेतकरी पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहिले असते. परंतु जिल्हाधिकारी यांनी तलाठी पवार यांच्या निलंबनाबाबत वैयक्तिक लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्यामुळे तसेच शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.अन्यथा पुन्हा आंदोलनदेवळा-चांदवड तलाठी संघाने आपले काम बंद आंदोलन तात्पुरते मागे घेतल्यानंतर गुरुवारी (दि.१५) तलाठी व मंडल अधिकारी यांनी तहसीलदारांकडे जमा केलेल्या डिजिटल स्वाक्षरी परत घेऊन आपले कामकाज सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली. तलाठी पवार यांच्या अन्यायकारक निलंबनाच्या बाबतीत आगामी काळात योग्य निर्णय झाला नाही तर पुन्हा आंदोलन चालू करण्यात येणार असल्याची माहीती तलाठी संघाने दिली आहे.
तलाठी संघाचे काम बंद आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 00:24 IST
देवळा : उमराणा सजेचे तलाठी एस. एस. पवार यांचे निलंबन मागे घेण्यासाठी देवळा व चांदवड तालुक्यातील तलाठी व मंडल अधिकारी यांनी सोमवारी (दि.१२) सुरू केलेले बेमुदत काम बंद आंदोलन जिल्हाधिकारी यांनी सदरच्या निलंबनाबाबत व्यक्तिगत लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष उगले यांनी दिली आहे.
तलाठी संघाचे काम बंद आंदोलन स्थगित
ठळक मुद्देदेवळा : जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्यवाहीचे आश्वासन