कृषी विभाग कर्मचाऱ्यांचे काळ्याफिती लावून काम

By Admin | Updated: April 19, 2016 00:37 IST2016-04-18T23:02:26+5:302016-04-19T00:37:16+5:30

कृषी विभाग कर्मचाऱ्यांचे काळ्याफिती लावून काम

Work of the staff of the staff of the staff is black | कृषी विभाग कर्मचाऱ्यांचे काळ्याफिती लावून काम

कृषी विभाग कर्मचाऱ्यांचे काळ्याफिती लावून काम

संगमेश्वर : महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागातील सहाय्यक ते संचालकापर्यंत २७ हजार कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीविरुद्ध असंतोष व्यक्त करण्यासाठी आजपासून आंदोलनास प्रारंभ झाला.
मालेगावच्या कृषी उपविभागात मालेगाव, सटाणा, नांदगाव हे तीन तालुके समाविष्ट आहेत. येथील सुमारे १९७ अधिकारी व कर्मचारी यांनी आजपासून काळ्याफिती लावून निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य कृषि सेवा महासंघातर्फे येत्या २४ एप्रिलपर्यंत काळ्याफिती लावून आंदोलन चालणार असल्याचे मालेगाव उपविभागीय कृषी अधिकारी कैलास पवार यांनी दिली.
तालुकास्तरावरील इतर खात्यातील अधिकाऱ्यांप्रमाणे कृषी विभागातील तालुका अधिकाऱ्याचे पद हे वर्ग एकचे असावे या विभागाच्या अधिकाऱ्यासह मनुष्यबळ आणि निधी मिळावा, अशी महासंघाची मागणी असल्याचे मालेगाव तालुकाध्यक्ष समाधान पवार यांनी सांगितले. सोमवारी (दि.२५) जल्हाधिकारी, आयुक्तालया समोर धरणे, दि. २६ मे ते ८ मे दरम्यान लेखणीबंद, ९ मे ते ६ जून जिल्हाधिकारी कार्यालयसमोर धरणे व ७ जूनपासून बेमुदत चक्री उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Work of the staff of the staff of the staff is black