सातपूर बस स्थानकाचे काम दहा वर्षांपासून रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 01:26 IST2020-09-16T23:11:39+5:302020-09-17T01:26:15+5:30
अनेक अडचणी: नागरिकांचे लोकप्रतिनिधीला साकडे सातपुर :- गेल्या दहा ते बारा वर्षांपासून सातपूर बसस्थानकाचे काम अतिशय धिम्या गतीने ...

बसस्थानकाचे काम पूर्ण करण्याच्या मागणीचे निवेदन आमदार सीमा हिरे यांना देतांना महादेवनगर जनसेवक समितीचे विजय अहिरे,सुनिल मौले,भारत भालेराव,संजय तायडे,अविनाश मौले,ज्ञानेश्वर आव्हाड, प्रवीण भवर,सुनिल गुंजाळ,बलराम रावळ,अक्षय बेंडकुळे,किशोर सोनवने,आदी
अनेक अडचणी: नागरिकांचे लोकप्रतिनिधीला साकडे
सातपुर :- गेल्या दहा ते बारा वर्षांपासून सातपूर बसस्थानकाचे काम अतिशय धिम्या गतीने सुरु आहे. सदरचे काम लवकरात लवकर करुन बसस्थानकाचे लोकार्पण करावे अशी मागणी महादेवनगर जनसेवक समितीच्या वतीने आमदार सीमा हिरे यांची भेट घेऊन करण्यात आली आहे.
तत्कालीन मनसेचे आमदार नितीन भोसले यांच्या कार्यकाळात आमदार निधीतून सातपूर गावातील बसस्थानक नुतनीकरनास प्रारंभ करण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात कधी ठेकेदार तर कधी निधी अभावी हे काम रेंगाळले आहे.मागील पंचवार्षिक काळात आमदार सीमा हिरे यांनी पहिल्या टप्प्याच्या कामाचे उदघाटन देखील केले आहे.आता दुसऱ्या पंचवार्षिक काळात तरी आमदार हिरे यांनी लक्ष देऊन बसस्थानकाचे काम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
याबाबत महादेवनगर जनसेवक समितीचे विजय अहिरे,सुनिल मौले,भारत भालेराव,संजय तायडे,अविनाश मौले,ज्ञानेश्वर आव्हाड,जीतु साळवे,प्रवीन भवर,नाना आव्हाड,सुनिल गुंजाळ,बलराम रावळ,अक्षय बेंडकुळे, सोनु पवार,किशोर सोनवने,कृष्णा भालेराव,दिपक काकवीपुरे,अंबादास कापसे,शांताराम गुंजाळ आदींसह पदाधिकाऱ्यांनी आमदार सीमा हिरे यांची भेट घेतली. अतिशय धिम्या गतीने सुरु असलेल्या बसस्थानकाचे काम लवकर पूर्ण करावे,आणि प्रवाश्यांची गैरसोय दूर करावी.प्रवाश्यांसाठी हे बसस्थानक खुले करण्यात यावे. यासह मतदार संघातील समस्या सोडवाव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.