सावरकर स्मारक नूतनीकरणाचे काम सुरू
By Admin | Updated: October 18, 2015 22:22 IST2015-10-18T22:19:20+5:302015-10-18T22:22:09+5:30
सावरकर स्मारक नूतनीकरणाचे काम सुरू

सावरकर स्मारक नूतनीकरणाचे काम सुरू
भगूर : येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर स्मारकाच्या विकासकामासाठी शासनाने सुमारे ५६ लाख रु पये मंजूर केले होते त्यानुसार निधीप्राप्त झाल्यानंतर येथील नूतनीकरण कामास सुरुवात झाली आहे. सुमारे महिनाभरापूर्वी स्मारकाच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. नूतनीकरण कामामध्ये स्मारक प्रवेशद्वार रचना बदलणे, लेवलिंंग, सीमेंट टाइल्स बसविणे व पावसाळ्यात ज्या भिंतींना ओल येते त्यांना सीमेंट प्लास्टर वर मातीचा लेप व मागील बाजूस दोन स्मारक खोल्या तयार करणे अशी विकासकामे सुरू करण्यात आली आहे. पुरातन विभागाच्या देखरेखीखाली स्मारकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान, स्मारकाच्या मूळ इमारतीला धक्का न लावता नूतनीकरण व्हावे, अशी अपेक्षा सावरकरप्रेमींनी केली आहे. (वार्ताहर)