पेगलवाडी ते त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:53 IST2020-05-30T22:54:53+5:302020-05-30T23:53:22+5:30
पेगलवाडी ते त्र्यंबकेश्वरसह सिन्नर-घोटी-धामणगावमार्गे वैतरणा रस्ता, सातुर्ली फाटा ते म्हसुर्ली-आहुर्ली रस्त्याच्या डांबरीकरण कामास खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

पेगलवाडी ते त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या कामास प्रारंभ
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातून जाणारा पेगलवाडी ते त्र्यंबकेश्वरसह सिन्नर-घोटी-धामणगावमार्गे वैतरणा रस्ता, सातुर्ली फाटा ते म्हसुर्ली-आहुर्ली रस्त्याच्या डांबरीकरण कामास खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
यावेळी कार्यकारी अभियंता व्ही. बी. मालुंजे, उपविभागीय अभियंता मनोज पाटील, शाखा अभियंता एस. टी. बडगुजर, एन. एम. खेडेकर आदी उपस्थित होते. दरम्यान, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, कैलास चोथे, मंगला आराधी, कल्पना लहांगे, त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त संतोष कदम, तालुकाप्रमुख रवि वारुंगसे, संपत चव्हाण, समाधान बोडके, भूषण अडसरे, सचिन दीक्षित, रवींद्र सोनवणे, संतोष कदम आदींनी खासदार गोडसे यांच्याशी तालुक्यातील प्रलंबित विकासकामांबद्दल चर्चा केली.