गोपीनाथ मुंडे स्मारकाचे काम अंतिम टप्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:19 IST2021-08-28T04:19:36+5:302021-08-28T04:19:36+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे साकारत असलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती स्मारकाची राज्याचे माजी दुग्ध व पशुसंवर्धन ...

गोपीनाथ मुंडे स्मारकाचे काम अंतिम टप्यात
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे साकारत असलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती स्मारकाची राज्याचे माजी दुग्ध व पशुसंवर्धन विकास मंत्री तथा विधान परिषदेत सदस्य महादेव जानकर यांनी पाहणी केली. मुंडे यांचे नाशिक जिल्ह्यातील नांदूरशिंगोटे येथे अद्ययावत स्मारक होत असून स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. शिवसेना युवा नेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून व माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळा व सुशोभीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. पंचायत राज समितीच्या तालुका दौऱ्यावर आलेल्या जानकर यांनी नांदूरशिंगोटे येथे धावती भेट देत स्मारकाच्या कामाची पाहणी केली. जानकर यांनी पथवे, तलाव तसेच बगिचा आदी कामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. ग्रामस्थांच्या वतीने सरपंच गोपाल शेळके यांनी जानकर यांचा सत्कार केला. यावेळी व्ही. एन. नाईक. शिक्षण संस्थेचे माजी संचालक आनंदराव शेळके, विनायकराव शेळके, माजी सरपंच शंकरराव शेळके, सोपान मंडलिक, ग्रामपंचायत सदस्य भारत दराडे, शशिकांत येरेकर, माजी उपसरपंच संजय शेळके, रवींद्र शेळके, लोकशिक्षण मंडळाचे संचालक सुधाकर शेळके, अरुण आव्हाड, गणेश महाडिक आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. गोपीनाथ गडानतंर सर्वात मोठे स्मारक नांदूरशिंगोटे येथे साकारत आहे.
--------------------
नांदूरशिंगोटे येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे स्मारकाची पाहणी करताना माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली. त्याप्रसंगी सरपंच गोपाल शेळके, आनंनदराव शेळके, विनायकराव शेळके, शंकरराव शेळके, सोपान मंडलिक, भारत दराडे, शशिकांत येरेकर, संजय शेळके, रवींद्र शेळके, सुधाकर शेळके, अरुण आव्हाड आदी. (२७ नांदुरशिंगोटे जानकर)
270821\27nsk_49_27082021_13.jpg
२७ नांदुूरशिंगोटे जानकर