वर्क्स कमिटीची शनिवारी निवडणूक
By Admin | Updated: January 10, 2016 23:45 IST2016-01-10T23:44:30+5:302016-01-10T23:45:08+5:30
वर्क्स कमिटीची शनिवारी निवडणूक

वर्क्स कमिटीची शनिवारी निवडणूक
नाशिकरोड : आयएसपी-सीएनपी मधील वर्क्स कमिटीच्या २८ जागांसाठी येत्या १६ जानेवारी रोजी मतदान होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कामगार व आपला पॅनलच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली. कामगार पॅनलचे आयएसपीमधील इस्टेट, हॉस्पिटल विभागातील उमेदवार दिनेश कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कामगार पॅनल आयएसपी कंट्रोल विभाग ५ जागा- दिनकर खर्जुल, भीमा नवाळे, डॉ. चंद्रकांत हिंगमिरे, भीमा साळवे, सुरेश आढाव. टेक्निकल विभाग ३ जागा- उल्हास भालेराव, भाऊसाहेब सूर्यवंशी, जगदीश जाधव. वर्कशॉप विभाग ३ जागा- अशोक पेखळे, राजाराम लहांगे, सुभाष ढोकणे. सीएसडी स्टोअर १ जागा- मच्छिंद्र मगर, इस्टेट हॉस्पिटल १ जागा- दिनेश कदम. आएसपी आपला पॅनल कंट्रोल - बाळासाहेब चंद्रमोरे, सुरेश लवांड, सतीश निकम, सुभाष दरोडे, दगू खोले. टेक्निकल विभाग - दामू ढोकणे, मोहन दोंदे, प्रकाश उगले. वर्कशॉप विभाग - भाऊसाहेब लोंढे, ज्ञानेश्वर जाधव, शिवाजी ढेरिंगे. सीएसडी स्टोअर - दिग्विजय पोटिंदे, तर सीएनपी कामगार पॅनल कंट्रोल विभाग ९ जागा- साहेबराव गाडेकर, सुभाष चव्हाण, सतीश चंद्रमोरे, योगेश कुलवदे, संजय गरकळ, तुळशीराम पाटोळे, निवृत्ती कदम, बाळू ढेरिंगे, कचरू ताजनपुरे. टेक्निकल विभाग २ जागा- सुरेश पर्वते, संतोष कटाळे.
आपला पॅनल सीएनपी - कंट्रोल विभाग - हरिभाऊ ढिकले, राजेंद्र शहाणे, अनिल जाधव, मधुकर गिते, सुनील ढगे, सुरेश बोराडे, राजेश पगारे, केशव गोजरे, शशिकांत आवारे. टेक्निकल विभाग - दिलीप क्षीरसागर, किसनराव बोराडे यांची उमेदवारी दोन्ही पॅनलच्या वतीने घोषित करण्यात आली. तर आयएसपी -सीएनपीमधील स्टाफच्या ४ जागांसाठी पॅनल व्यतिरिक्त उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. (प्रतिनिधी)